रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संगीतकार ए. आर. रहमान पत्नीपासून विभक्त होणार, लग्नाच्या २९ वर्षांनी घटस्फोटाचा निर्णय, नेमकं काय बिनसलं?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 20, 2024 | 8:00 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Oscar winning composer A. R. Rahman is set to divorce wife Saira Bano after 29 years of marriage

संगीतकार ए. आर. रेहमान व त्यांची पत्नी एकमेकांपासून विभक्त होणार, लग्नाच्या २९ वर्षांनी पत्नीबरोबरचे सूर बिघडले

आपल्या जादुई संगीताने अवघ्या जगाला वेड लावणारा गायक व संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान. रहमान यांनी संगीतविश्वामध्ये अमूल्य असं योगदान दिलं असून दाक्षिणात्य तसंच हिंदी सिनेमाविश्वात त्यांचे संगीत विशेष लोकप्रिय आहेत. परदेशातही त्यांच्या गाण्यांची एक वेगळी क्रेझ आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी रसिकांच्या मनात आणि ओठांवर आहेत. अशातच त्यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे ए. आर. रहमान व त्यांची पत्नी एकमेकांपासून विभक्त होणार आहेत. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान २९ वर्षांच्या लग्नानंतर पत्नी सायरा बानोपासून वेगळे होणार आहेत.  (A. R. Rahman Divorce)

रहमान आणि सायरा यांच्या वकिलाने एक जाहीर निवेदन जारी करून सांगितलं की, या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. रहमान यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या, जे सांभाळणे तिच्यासाठी खूप कठीण झालं आहे. त्यामुळे आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडप्याचा विभक्त होण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही. बराच वेळ विचार करून आणि समजून घेतल्यानंतर सायरा या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे. सायराने प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, “ती आता हे नातं वाचवू शकत नाही”.

View this post on Instagram

A post shared by Irshad pklr (@_irshad_pklr_)

आणखी वाचा – “उगाच दिखावा करतात आणि…”, इंडस्ट्रीमुळे वागणूकीमध्ये बदल झाल्याचा सविता मालपेकरांचं वक्तव्य, म्हणाल्या, “आपलीच माणसं…”

इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, “लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा यांनी त्यांचे पती ए. आर. रहमानपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नातेसंबंधातील महत्त्वपूर्ण भावनिक तणावानंतर घेतला आहे. एकमेकांवर त्यांचं नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असं आढळून आलं की, तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. जी दोघांना भरून काढता आलेली नाही”. सायरा यांनी वेदना आणि त्रासामुळे हा निर्णय घेतल्याचे आवर्जून सांगितलं. सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयतेची अपेक्षा व्यक्त करतात, कारण ती तिच्या आयुष्यातील या कठीण काळातून जात आहे.

आणखी वाचा – 20 November Horoscope : मेष, वृषभ आणि कर्क या चार राशींची प्रलंबित कामे बुधवारी पूर्ण होतील, तुमच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

दरम्यान, ए. आर. रहमान आणि सायरा यांचा विवाह १९९५ मध्ये झाला होता. दोघांना खतिजा, रहीमा, आमेन अशी तीन मुलं आहेत. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी ऑस्कर जिंकणारे संगीतकार ए. आर. रहमान हे भारतातील महान संगीतकार आहेत. आजवर त्यांनी अनेक बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटांना संगीत दिले आहे. अशातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या बातमीमुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

Tags: A. R. Rahman DivorceA. R. Rahman Saira Banu DivorceA. R. Rahman Saira Banu Divorce Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
A. R. Rahman shared a post on X and commented on his separation from his wife.

"वाटलं होतं ३० वर्षे पूर्ण करु पण", घटस्फोटाच्या निर्णयानंतर रहमानने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, म्हणाला, "या नाजुक काळात..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.