शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकणारा ‘Openheimer’ चित्रपट OTT वर कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 11, 2024 | 12:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Oscar 2024

सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकणारा 'Openheimer' चित्रपट OTT वर कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

Oscar 2024 : क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपेनहायमर’ने ऑस्कर २०२४मध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले असून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये १३ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते, त्यापैकी ७ पुरस्कारांवर या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे स्कोअर, सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या पुरस्कारांवर नाव कोरले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटाची क्रेझ होती आणि ऑस्कर जिंकल्यानंतर लोकांमध्ये याबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली असल्याचं पाहायला मिळतंय.

‘ओपेनहायमर’ हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला विसरला असाल वा पाहायचा राहून गेला असेल तर तुम्ही घरी बसून OTT वर त्याचा आनंद घेऊ शकता. या वर्षीचा सर्वात जास्त ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट ‘Openheimer’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर मिळेल हे जाणून घेऊया. २०२३ मध्ये ऑस्कर विजेता चित्रपट ‘ओपनहायमर’ प्रदर्शित झाला. हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर जगभरात या चित्रपटाने खळबळ उडवून दिली. या चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाने तब्बल ९५० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.

आणखी वाचा – वयाच्या पाचव्या वर्षीच दिला मुलाला जन्म, दोन किलोपेक्षा अधिक होतं बाळाचं वजन अन्…; ‘ते’ रहस्य अजूनही उलगडलं नाही कारण…

‘ओपेनहायमर’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनी, OTT प्लॅटफॉर्म ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाला. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहण्यासाठी यूजर्सना १४९ रुपये खर्च करावे लागले. मात्र आता चाहत्यांना या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मोफत आनंद घेता येणार आहे.’Openheimer ‘ हा चित्रपट २१ मार्चला OTT प्लॅटफॉर्म Jio Cinemaवर मोफत पाहता येणार आहे. याशिवाय ऍपल या ऍपवरही हा चित्रपट पैसे भरुन पाहू शकता.

आणखी वाचा – “लक्ष्मीकांतने हळूहळू स्वतःला संपवलं, कोणाचंही न ऐकता…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भावाचं मोठं विधान, म्हणाले, “बायकोचं ऐकलं असतं तर…”

‘ओपेनहायमर’ हा चित्रपट गेल्या वर्षी २१ जुलै २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. सिलियन मर्फीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी जूनियर, फ्लॉरेन्स पग यांच्यासह इतर अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर नोलन यांनी केले आहे. चित्रपटाची कथा अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे.

Tags: entertainmentOpenheimer movieOpenheimer oscarOpenheimer oscar 2024
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mahira Khan On Pregnancy

पहिलं लग्न मोडलं, ४ महिन्यांपूर्वी दुसरं लग्न अन्…; माहिरा खान लवकरच देणार गुडन्यूज?, गरोदरपणाबाबत म्हणाली, "माझं वजन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.