गेल्या काही दिवसांपासून युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचं नाव सातत्याने चर्चेत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे रणवीर चांगलाच अडचणीत आला. शोमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानामुळे प्रकरण बरंच चर्चेत आलं होतं. अनेक राजकीय मंडळींनीही रणवीरला विरोध दर्शवला होता. या वादामुळे रणवीर सोशल मीडियापासूनही दूर होता. इतकंच काय तर त्याच्या पॉडकास्टलाही फुलस्टॉप लागला होता. आता पुन्हा त्याने कमबॅक केलं आहे. त्याच्या युट्युब चॅनलद्वारे पॉडकास्ट सुरु आहे. सगळं सुरळीत सुरु असताना रणवीर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रणवीरने पाकिस्तान संदर्भात केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टनंतर रणवीर नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं. (Ranveer allahbadia support Pakistan)
नक्की काय आहे पोस्ट?
भारत-पाकिस्तान तणावाबाबात रणवीरने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने पाकिस्तानी लोकांची माफी मागितली आहे. तो इथवरच थांबला नाही. या पोस्टमुळे भारतीयही नाराज होतील हेही रणवीरने सांगितलं. रणवीर म्हणाला, “प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो. या पोस्टनंतर कित्येक भारतीय माझा राग करतील. पण हे बोलणं खूप गरजेचं आहे. कित्येक भारतीयांप्रमाणे माझ्या मनातही तुमच्याविषयी राग आहे”.
आणखी वाचा – जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल
पाकिस्तानी प्रेमाने स्वागत करतात
“आमच्यामधील काही लोकांना शांती हवी आहे. जेव्हा पाकिस्तानी लोकांना आम्ही भेटतो, तेव्हा ते आमचं प्रेमाने स्वागत करतात. पण तुमचा देश सरकार चालवत नाही. तुमचं सैन्य आणि सिक्रेट सर्विस (ISI) सगळं चालवतं. काही पाकिस्तानी या दोन्ही गोष्टींपेक्षा खूप वेगळे आहेत. काही पाकिस्तानी लोकांच्या मनात शांती, समृदधीचे स्वप्न आहेत. या दोन्ही खलनायकांनी स्वातंत्र्यानंतर तुमच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवलं आहे. आम्ही द्वेष पसरवत आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर मी मनापासून माफी मागतो”.
Beer biceps Ranveer Allahabadia asking "sorry" in his deleted instagram slide posts. This is disrespectful to the soldiers who were in frontlines protecting our country.
— ً (@gigglekook) May 10, 2025
Govt needs to take action on him and dhruv rathee channel which operates in India but sympathizes with 🇵🇰 pic.twitter.com/33bSZhLF9v
भारतीय व पाकिस्तानकडून खोट्या बातम्या
पुढे तो म्हणाला, “पाकिस्तानी लोकांना भेटणारे भारतीय काही गोष्टी समजतात. पण सध्या भारतीय व पाकिस्तानी मीडिया (वृत्त वाहिनी) दोघंही खोट्या बातम्या पसरवत आहेत. आमचे बरेच लोक सीमेवर असलेल्या लोकांसाठी शांती हवी म्हणून प्रार्थना करतात. भारतालाही पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद संपवायचा आहे. भारतीय विरुद्ध पाकिस्तान लोकांमध्ये वाद नाही तर भारत विरुद्ध पाकिस्तान सैनिक व ISI असा वाद आहे. आणि हे अंतिम सत्य आहे. आशा आहे की, सगळीकडे लवकरच शांतता पसरेल”. रणवीरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हा कधीच सुधारणार नाही, हा आपला सैन्याचा अपमान आहे, तुला लाज वाटली पाहिजे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.