छोट्या पडद्यावर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्या खूप गाजतोय. कोरोना काळातील हास्यजत्रेच प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनात एक महत्वाचं स्थान होत. ते स्थान कायम ठेवण्याचं काम हास्यजत्रेतील कलाकार आणि त्यांच्या विविध विषयांच्या स्किट्स ने केले आहे. हास्यजत्रेचे निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी पुरेपूर विचार करून या हास्यजत्रेची मांडणी केली आणि या मांडणीत मांडलेले समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे, रोहित माने, इशा डे, वनिता खरात, निखिल बने, दत्तू मोरे, प्रभाकर मोरे, अरुण कदम इत्यादी कलाकारांना प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश आले.(Prajakta Mali New Ventures)
या कार्यक्रमात या कलाकार मंडळीं व्यतिरिक्त प्रसिद्ध झालेलं अजून एक पात्र म्हणजे निवेदिकेच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी. हास्य जत्रेच्या एखाद्या तरी स्किट मध्ये प्राजक्ता वर एखादा पंच हमखास असतोच आणि परीक्षकांच्या चेहऱ्यावर हसू नेहमीच फुलवतो. नुकत्याच एका स्किट मधील पंच ने असाच हशा पिकवला आहे. आणि तो व्हिडिओ देखील चांगलाच चर्चेत आहे.
हे देखील वाचा- “महाराजांना वाचवावं लागेल” चिमुकलीचा व्हिडिओ होतोय व्हायरल
प्राजक्ता सुरु करणार नवीन उद्योग(Prajakta Mali New Ventures)
कोणत्याही कार्यक्रमाच्या यशामध्ये त्यातील कलाकारांचा मोलाचा वाटा असतो. हास्यजत्रेतील कलाकार त्यांच्या विनोदी कौशल्यामुळे कायमच चर्चेत असतात. आणि अशाच विनोदी अंदाजामुळे हास्यजत्रा फेम ओंकार राऊत आज घरा घरात पोहोचलाय.ओंकारचे अनेक स्किट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. याच स्किटसचा भाग म्हणून कलाकारांवर देखील अनेक विनोद घडत असतात, असाच ओंकारच्या एका स्किट्चा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

ओंकारच्या या स्किट मध्ये प्राजक्ता माळीला टार्गेट केले आहे. प्राजक्ता माळीने प्राजक्तराज नावाचा बिसनेस सुरु केलाय. हाच संदर्भ वापरून ओंकार म्हणाला आहे कि, प्राजक्ताला ताजे मासे विकायचा बिसनेस करायचाय आणि त्याच नाव ‘प्राजक्तमत्स्या’ असे असेल. त्याच बरोबर तिला डांबर गोळ्यांचा हि बिसनेस करायचा असून त्याच नाव ‘प्राजक्तवास’ असं तिला ठेवायचं आहे. त्याच्या या स्किट ने चांगला च हशा पिकवला. त्याच्या या व्हिडिओ वर प्रेक्षकांनीही कमेंट्स करून भरपूर प्रतिसाद दिला आहे.(Prajakta Mali New Ventures)
हे देखील वाचा- आणि शूटिंग दरम्यान सायली-अर्जुनाचा झाला होता अपघात सेटवर सगळ्यांची अशी होती रिऍक्शन!
अशाच एका पेक्षा एक स्किट्स मुळे आणि त्यांतील विनोदांमुळे हास्यजत्रा आणि त्यातले कलाकार कायम चर्चेत असतात. आणि प्रेक्षकांचं भरघोस प्रेम या कलाकारांना वेळोवेळी मिळत असत. प्रेक्षकांच्या ह्या प्रतिसादामुळेच हे कलाकार आज घरोघरी पोचले आहेत.