शुक्रवार, जुलै 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 31, 2026 | 11:21 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Taarak Mehta ka ooltah chashmah

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला...

Taarak Mehta ka ooltah chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘बाघा’ची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारियाचे वडील अरविंद वेकारिया यांचे जून महिन्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने तन्मय पूर्णपणे कोलमडून गेला. तन्मयने सांगितले की जेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तो शूटवर होता आणि शूटिंग पूर्ण केल्यानंतरच तो त्याच्या वडिलांकडे हॉस्पिटलमध्ये गेला होता. वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर दुःख पोटात घालून तन्मयने म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बागाने शूटिंग सुरु ठेवलं. सेटवरचा त्याचा शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. ज्यात शूटिंग संपल्यावर बागाला अश्रू अनावर झाले. आणि तो निर्माते असित मोदी यांच्याकडे ढसाढसा रडू लागला.

तन्मय वेकारियाने एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना सांगितले की, आपल्या वडिलांची शेवटची इच्छा होती की जेव्हा आपला मुलगा शूटिंग करत असेल आणि त्यांच्या मृत्यूची बातमी समजेल तेव्हा त्याने शूट सोडू नये. त्याने त्याचे शूट पूर्ण करावे. तन्मयने वडिलांची शेवटची इच्छा अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण केली.
जेव्हा त्याचे वडील अरविंद वेकरिया यांचे रुग्णालयात निधन झाले तेव्हा तन्मय त्याचे शूट करत होता. तन्मय वेकारिया यांनी सांगितले की, त्याचा मास्टर शॉट केल्यानंतर, नटू काकांची भूमिका साकारणाऱ्या किरण भट्ट यांनी तन्मयला हॉस्पिटलमध्ये सोडले. किरण भट्ट हे संपूर्ण वेळ तन्मयसोबत होते.

आणखी वाचा – देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

किरण भट्ट हे तन्मय वेकरियाच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते. अरविंद वेकरिया हे गुजराती थिएटरचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक होते. अरविंद वेकारिया यांनी अनेक दशके गुजराती रंगभूमीची सेवा केली. सशक्त अभिनेता असण्यासोबतच त्यांनी अनेक नाटकांचे यशस्वी दिग्दर्शन आणि निर्मितीही केली होती. तारक मेहता का उल्टा चष्मामध्येही त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. शोमध्ये ते एका ज्वेलरी स्टोअरचे मालक बनले. ज्यांच्याकडे आत्माराम भिडे आपले दागिने गहाण ठेवण्यासाठी गेले होते.

आणखी वाचा –“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

तन्मयबद्दल बोलायचे झाले तर तो बऱ्याच दिवसांपासून तारक मेहता या शोमध्ये काम करत आहे. सुरुवातीला तो या शोमध्ये छोट्या भूमिका करत असे. त्याने ऑटो ड्रायव्हरची भूमिकाही केली होती. आता तो जेठालालच्या दुकानात काम करतो. नुकताच त्यांच्या प्रेमकथेचा ट्रॅक शोमध्ये दाखवण्यात आला. तारक मेहता या शोला २८ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण झाली. टीमने नुकताच एकत्र साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tags: serial newsserial updateTaarak Mehta Ka Ooltah Chashmah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Patri Sarkar 1942
Entertainment

इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर, क्रांतीची गाथा सांगणाऱ्या ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

जुलै 31, 2026 | 11:22 am
Taarak Mehta ka ooltah chashmah
Entertainment

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

जुलै 31, 2026 | 11:21 am
dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
Next Post
Patri Sarkar 1942

इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर, क्रांतीची गाथा सांगणाऱ्या ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.