शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कॅन्सर रुग्णांसाठी क्रांती रेडकरचं नवऱ्यासह कौतुकास्पद काम, अन्नदानही केलं अन्…; म्हणाली, “दु:ख दूर करण्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2024 | 10:09 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
On the occasion of Cancer Day Kranti Redkar did social work with her husband Sameer Wankhede video shared on social media

Video : कॅन्सर रुग्णांसाठी क्रांती रेडकरचं नवऱ्यासह कौतुकास्पद काम, अन्नदानही केलं अन्...; म्हणाली, "दु:ख दूर करण्यासाठी..."

मराठी मनोरंबजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे मनोरंजन सृष्टीत कामही करतात व आपले समाजभानही जपतात. अशीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. क्रांती ही सोशल मीडियावरील कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. क्रांती सध्या मनोरंजन सृष्टीत फार कार्यरत नाही. पण ती तिचा हा अमूल्य वेळ समाजकार्यांत व लोकांची सेवा करण्यात रुजवत आहे असं म्हणायला हरकत नाही. क्रांती रेडकर तिचे पती समीर वानखेडे यांच्याबरोबर समाजकार्यात आपला हातभार लावत आहे.

काल (४ फेब्रुवारी) रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सरबद्दल जागरूकता वाढविणे. तसेच, या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना नवी आशा देणे असा आहे आणि हीच नवीन आशा देण्याचे प्रयत्न क्रांती व तिचे पती समीर वानखेडे यांनी केला आहे. कालच्या कर्करोग दिनाचे औचित्य साधत क्रांती व समीर यांनी कर्करोग्यांची सेवा केली. याचे काही खास क्षण क्रांतीने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीचं आजारपणानंतर कमबॅक, लाडकी लेक व अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली…

क्रांतीने तिच्या सोशल मीडियावर कर्करोग्यांची सेवा करतानाचे काही खास क्षण शेअर करत असे म्हटले आहे की, “जागतिक कर्करोग दिनानिमित्त आम्हाला सत्यार्थी फाउंडेशन, संत घाडगे महाराज संस्था येथे काही कर्करोग रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळाला. या प्राणघातक आजाराने प्रभावित झालेल्या अनेक लोकांचे आणि कुटुंबांचे सर्व दु:ख दूर करण्यासाठी आणि जगभरातील सर्व कर्करोग रुग्णांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व प्रार्थना व्यक्त करतो.” 

आणखी वाचा – तब्बल २० वर्षांनी येणार ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा दूसरा भाग येणार, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला…

या व्हिडीओमध्ये क्रांती रेडकर तिच्या पतीसह कर्करोग्यांना अन्नदान करत असताना पाहायला मिळत आहे. तसेच तिने तिथल्या कर्करोग्यांसह संवादही साधला. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत. दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये तिच्या या समाजभान जपणाऱ्या कृतीचे कौतुकही केलं आहे.  

Tags: entertainment newskranti redkarmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsSameer Wankhedeक्रांती रेडकरमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनसमीर वानखेडे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Aamir Khan Apologise

"खूप लाज वाटते अन्…”, संदीप रेड्डी यांच्या टीकेनंतर आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीची घेतली बाजू, माफी मागत म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.