बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तब्बल २० वर्षांनी येणार ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा दूसरा भाग येणार, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2024 | 9:50 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
The shooting of the second part of the popular movie Navara Mazha Navsacha will start from tomorrow and film will be released soon.

तब्बल २० वर्षांनी येणार ‘नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा दूसरा भाग येणार, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला…

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, जॉनी लिव्हर यांच्या विनोदी अभिनयाने धमाल उडवून दिली होती. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, जॉनी लीव्हर, रीमा लागू, विजय पाटकर, निम्रिती सावंत, वैभव मांगले, प्रदीप पटवर्धन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला आणि आज इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ तितकीच पाहायला मिळत आहे.

आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने प्रेक्षकांकडून पाहिला जातो. चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, जॉनी लीव्हर, रीमा लागू, विजय पाटकर, वैभव मांगले, प्रदीप पटवर्धन यांच्यासह अभिनेते जयवंत वाडकर यांनीदेखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. जागे असतानाच घोरणाऱ्या व्यक्तीच्या पात्राने चित्रपटात धम्माल उडवून दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Jaywant Pandurang Wadkar (@jaywantwadkar)

हेही वाचा – “कॅन्सरसारख्या आजाराची चेष्टा…”, पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “बहिष्कार टाकावा अन्…”

आपल्या नानाविध भूमिकांनी चर्चेत असणारे जयवंत वाडकर हे सोशल मीडियावरदेखील तितकेच सक्रिय असतात आणि या सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या कामाची माहिती देत असतात. अशातच त्यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भाग येणार असल्याची माहिती दिली आहे. जयवंत वाडकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला असून याखाली त्यांनी उद्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचेही म्हटले आहे.

हेही वाचा – ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार महाराजांच्या शौर्य, पराक्रम अन् बलिदानाचा जाज्वल्य इतिहास

जयवंत यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या चित्रपटाबद्दल उत्सुकता दाखवली आहे. दरम्यान, अनेकांनी या चित्रपटात अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना मिस करणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होणार यासाठी अनेक चाहते मंडळी उत्सुक आहेत.  

Tags: entertainment newsmarathi entertainment newsmarathi moviesMarathi newsNavara Mazha Navsachaनवरा माझा नवसाचामनोरंजन बातमीमराठी चित्रपटमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Aarya 3, Bhashak, Messi's World Cup, Avatar The Last Airbender will be released on OTT soon see the details

फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर अनुभवता येणार सस्पेन्स, क्राईम अन् स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट व सीरिज, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.