बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारचा आगामी “OMG 2” सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. सिनेमाचा टिझर व पहिल्या गाण्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर या सिनेमाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘हर हर महादेव’ असं या गाण्याचं नाव असून या गाण्यात अक्षय शिवशंकराच्या रुपात तांडव करताना दिसत आहे. (OMG 2 New Song Released)
विक्रम मॉन्ट्रोजच्या आवाजात गायलेलं ‘हर हर महादेव’ गाणं शेखर अस्तित्व यांनी लिहिलं आहे, तर विक्रम मॉन्ट्रोज यांनी स्वतः संगीतबद्ध केलं आहे. गाण्याच्या सुरुवातीला अक्षय एका ट्रकच्या सिंहासनावर बसलेला असतो, तिथे त्याच्यासमोर अनेक जटाधारी साधु नाचताना दिसतात. अचानक अक्षय ट्रकमधुन खाली उडी मारतो भगवान शंकराच्या अवतारात दिसत असून ज्यात तो तांडव नृत्य करताना दिसत आहे. हे गाणं ऐकून आणि अक्षयचं हे रुप पाहून अंगावर शहारा येतो.
पहा “OMG 2” मधील हे नवं गाणं (OMG 2 New Song Released)
🔱#HarHarMahadev song out now: https://t.co/vvQvJV7aAs#OMG2 in theatres on August 11.
— Akshay Kumar (@akshaykumar) July 27, 2023
अक्षयच्या या सिनेमातील नवं गाणं चाहत्यांना प्रचंड आवडलं असून याचा व्हिडिओ रिलीज होताच चाहते अक्षय कुमार व गाण्याचे भरभरून कौतुक करत आहे. अक्षयच्या या आगामी सिनेमामध्ये पंकज त्रिपाठी, यामी गौतम आदी प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे देखील वाचा : “मी बहिरी नाही…”, फोटोग्राफर्सवर भडकल्या जया बच्चन, नेटकरी म्हणाले, “हिच्याबरोबर ऐश्वर्या..”
पण सिनेमाच्या रिलीजआधी तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच सेन्सर बोर्डाने हा सिनेमा पहिला असून सिनेमात तब्बल २० कट्स सुचवले आहेत. आणि A सर्टिफिकेट देण्याची सूचना बोर्डाने सिनेमाच्या निर्मात्यांना दिली आहे. त्यामुळे हा सिनेमा आता १८ वर्षाखालील मुलांना आणि कुटूंबासमवेत पाहता येणार नाही. याचा मोठा फटका अक्षयसह निर्मात्यांना बसणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. (OMG 2 Movie)