सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Nitin Desai Suicide : नितीन देसाईंना हत्तींविषयी विशेष प्रेम का होतं? स्वतःच सांगितलं होतं कारण, म्हणाले, “इतिहासाचा अभ्यास करताना…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 2, 2023 | 5:54 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Nitin Desai Erected 12 Elephants in Paris

Nitin Desai Erected 12 Elephants in Paris

Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन करणारे मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज गळफास घेत आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून कलाकारांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. (Nitin Desai Suicide)

ऐतिहासिक व अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन करणारे नितीन देसाई यांच्या मालिका आणि चित्रपटांच्या सेटवर बऱ्याचदा आपल्याला भव्य हत्ती पाहायला मिळाले. त्यामुळेच नितीन देसाई यांना जेव्हा विदेशात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी पॅरिसच्या रस्त्यावर २४ फुटांचे १२ हत्ती एका रात्रीत उभे केले होते. (Nitin Desai Erected 12 Elephants in Paris)

हे आहे ‘खास’ कारण… (Nitin Desai Erected 12 Elephants in Paris)

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची कर्जतच्या एन. डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या

एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या विशेष कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, “गणपती बाप्पामुळे मला हत्तींविषयी विशेष आदर आहे. यामुळे मला इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट आवर्जून जाणवली ती म्हणजे, सध्याच्या काळात जसे पैशाला महत्त्व आहे तसे पूर्वीच्या काळात हत्तींना महत्त्व होते. या विशिष्ट राज्याकडे एवढे हत्ती, या मंदिराकडे तेवढे हत्ती… एकंदर हत्तींमुळे एखाद्या माणसाचे महत्त्व वाढायचे. त्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर पॅरिसमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी तिथे हत्तींची कलाकृती साकारली होती.”

तसेच माझ्या कलेला हत्तींनीच आशीर्वाद दिला असल्याचे सांगताना नितीन देसाई म्हणाले होते, “त्यावेळेस मी व माझ्या पत्नीने पॅरिसमधील एका रेल्वे स्थानकापासून संपूर्ण रस्त्यावर एका रात्रीत हत्तींची मांडणी केली होती. जवळपास २४ फुटांचे १२ हत्ती मी एन.डी. स्टुडिओमध्ये बनवले आणि ते पॅरिसच्या रस्त्यावर उभे केले. इथून ते हत्ती फोल्ड करून माझ्या टीमने पाठवले होते. रात्री ९ पासून तयारी सुरु होऊन ते सकाळी ६ वाजता पूर्ण झाली. अशा अनेक प्रसंगांमुळे माझ्या मनात हत्तींबद्दल प्रचंड क्रेझ आहे”. (Nitin Desai Erected 12 Elephants in Paris)

हे देखील वाचा : Nitin Desai Suicide : लालबागच्या राजाच्या मंडप सजावटीचं काम करणार होते नितीन देसाई, दोन दिवसांपूर्वी लालबागमध्येही पोहोचले होते अन्…

Tags: Nitin Desai Erected 12 Elephants in Parisnitin desai suicidetrending
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Nitin Desai Look

वाढलेली दाढी, केस अन्…; नितीन देसाईंनी त्यांच्या लूकमध्ये बदल का केला? स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेले, “नवस वा तप…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.