Nitin Desai Suicide Case : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (२ ऑगस्ट) गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर कर्जत येथील एनडी स्टुडिओवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे. एकीकडे नितीन देसाईंच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडत असताना आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nitin Desai Suicide Case)
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे. एनडी स्टुडिओ कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नेहा नितीन देसाई यांच्या तक्रारीवरून ‘ईसीएल फायनान्स कंपनी’ व ‘एडलवाईस एआरसी’चे पदाधिकारी अशा पाच जणांविरोधात कलम ३०६, ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा – Nitin Desai Funeral : नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनासाठी मराठी कलाकारांची गर्दी, आमिर खानचीही हजेरी, पण इतर बॉलिवूडकरांनी फिरवली पाठ?
दरम्यान, ‘एडलवाईस एआरसी’ने नितीन देसाई यांच्या कंपनीच्या कारवाईसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांच्या ‘ND’s Art World Private Limited’ कंपनीवर तब्बल २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. आणि त्याअंतर्गत एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने २५ जुलै रोजी कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी खंडपीठाने जितेंद्र कोठारी यांची अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशन म्हणून नियुक्ती केली होती. या आदेशाविरुद्ध नितीन देसाईंच्या कंपनीने नवी दिल्लीतील खंडपीठात अपील केले होते. पण ते १ ऑगस्ट रोजी हे अपील फेटाळून लावण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
हे देखील वाचा – नितीन देसाईंच्या ‘एनडी स्टुडिओ’वर २५२ कोटींचं कर्ज, ‘एडलवाईस एआरसी’ने थकबाकीचा अहवाल आणला समोर
त्यामुळेच नितीन देसाई यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असेल का ? अशी चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान, नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी एक चिट्ठी लिहीत एनडी स्टुडिओतच माझी अंत्यसंस्कार करण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार नितीन देसाई यांच्यावर आज ‘एनडी स्टुडिओ’ येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. (Police files FIR Against 5 People in Nitin Desai Suicide Case)