शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंबानींच्या सूनेचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, घरामध्येच मोठी पार्टी, बॉलिवूडकरांची गर्दी अन्…; आतमध्ये नक्की काय घडलं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2024 | 12:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Radhika Merchant Birthday Video

अंबानींच्या सूनेचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस

Radhika Merchant Birthday Video : अनंत अंबानीबरोबरच्या लग्नानंतर राधिका मर्चंट आता अंबानी कुटुंबाची धाकटी सून बनली आहे. मुकेश व नीता अंबानी यांच्या लाडक्या सूनेचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. अलीकडेच, अंबानी कुटुंबाने राधिकाचा वाढदिवस त्यांच्या अँटिलिया येथील आलिशान घरात साजरा केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राधिका मर्चंटच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ कालचा आहे. या व्हिडीओमध्ये राधिका अँटिलिया येथील तिच्या सासरच्या घरी कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा करत आहे. व्हिडीओमध्ये राधिका मर्चंटने पांढऱ्या टॉपसह लाल स्कर्ट घातलेला दिसत आहे. यामध्ये राधिका आधी केक कापताना आणि नंतर एक-एक करुन सर्वांना खाऊ घालताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये राधिकाची सासू अर्थात नीता अंबानीही अतिशय सुंदर लूकमध्ये दिसली. तिने फिकट हिरव्या रंगाचा रफल ड्रेस घातला आहे. नीता अंबानी यांची दोन मुले आणि पती मुकेश अंबानी देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आपल्या धाकट्या सूनेचा वाढदिवस साजरा करत नीता अंबानी खुश दिसत आहेत. यावेळी त्या नाचतानादेखील दिसल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहतेही या व्हिडीओवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यचे जुळतायत सूर, मारुतीची त्यांच्या मैत्रीला नापसंती, पुढे काय होणार?

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

अनंत अंबानीशी लग्न केल्यानंतर राधिका मर्चंटची ही पहिलीच वाढदिवसाची पार्टी होती, जी अंबानी कुटुंबीयांच्या घरी अँटिलिया येथे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसह साजरी करण्यात आली. महेंद्रसिंग धोनी उर्फ ​​एमएस धोनीनेही ओरीबरोबर पोज दिली. या पार्टीत शाहरुख खान व गौरी दिसले नाहीत, पण त्यांची दोन मुलं सुहाना व आर्यन या पार्टीत सहभागी झाले होते. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांचीही या पार्टीमध्ये हजेरी दिसली.

आणखी वाचा – “हलक्यात घेऊ नका”, सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून पुन्हा धमकी, केली ‘इतक्या’ कोटींची मागणी अन्…

राधिका मर्चंटने या वर्षी जुलैमध्ये नीता व मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीबरोबर लग्न केले. दोघेही लग्नाआधी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर अनंत व अंबानी यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचा उत्सव अनेक महिने सुरु असल्याचं दिसलं. ज्यासाठी अनेक स्वागत समारंभही आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये राजकारण्यांपासून बॉलिवूडपर्यंत अनेक बड्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता. लग्नाआधी दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्सही मोठ्या थाटामाटात पार पडले. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनीही सहभाग घेतला होता.

Tags: Anant Ambani and Radhika Merchantradhika merchantRadhika Merchant Birthday Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Itsmajja Original Paus Series updates

'पाऊस' वेबसीरिजमधील ट्वीस्ट आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अजूनही सायलीला विशालची आठवण, पुढे काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.