स्पर्धेच्या जगात माणूस स्वतः पुढे जाणयासाठी इतरांचे पाय खेचतो हे बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाने अनुभवलेलं असत. पण काही घटना त्याला अपवाद ठरतात. खास करून चित्रपट सृष्टी बद्दल बोलताना या गोष्टींकडे सगळे भुवया उंचावून पाहत असतात. कलाकार जेवढा यशाच्या शिखरावर जातो तितकंच त्याच्या बद्दल सकारात्मक आणि नकारत्मक दोन्ही गोष्टींबद्दल बोललं जात. पण स्वतः साठी चालून आलेल्या पात्राची जागा स्वतःहून दुसऱ्या कलाकाराला देणं आणि त्या कलाकाराने ही ती उत्तम निभावणं हे फार कमी वेळा घडत. मराठी चित्रपट सृष्टीत असाच एक प्रसंग घडला होता अभिनेते निळू फुले आणि अभिनेता अशोक सराफ यांच्या बाबतीत. आज निळू फुले यांचा वाढदिवस त्या निम्मित जाणून घेऊ काय आहे हा किस्सा.(Nilu Phule Ashok Saraf)
तर मंडळी विषय चालू होता दादा कोंडके यांच्या यशस्वी चित्रपटांमधील पांडू हवालदार या चित्रपटाचा. हल्लीच्या जमण्यात प्रसाद ओक, महेश मांजरेकर, प्रवीण तरडे या दिगदर्शकांचं नाव अगदी अभिमानानं घेतलं जात त्याच अभिमानानं नाव घेतलं जायचं ते अभिनेते दादा कोंडके यांचं. चित्रपटाची कथा, गीत, डायलॉग आणि अभिनय ही या सर्व घटकांमध्ये फक्त आणि फक्त दादा कोंडके यांचं नाव अग्रेसर असायचं.
हे देखील वाचा- गर्भवती अभिनेत्रीला धो धो पाऊसात ही निळू फुलेंनी केली होती मदत

निळू भाऊ दादांना म्हणाले…(Nilu Phule Ashok Saraf)
पांडू हवालदार एका हवलदाराची भूमिका खुद्द दादा साकारणार होते तर दुसऱ्या हवलदाराची भूमिका कोण साकारणार यासाठी दादांचा शोध सुरु होता. दादांच्या नजरेत एक नाव होत ते म्हणजे जेष्ठ अभिनेते निळू फुले या भूमिकेसाठी लागणार अप्रतिम टाईमिंग आणि त्या साठी उपयुक्त नट त्याकाळी निळू भाऊ यांच्या शिवाय कोण नाही हे दादांनी
पक्कं हेरलं होत.

दादा कोंडके ते पात्र घेऊन निळू फुले यांच्या कडे गेले परंतु काही कारणांमुळे निळू फुले यांनी नकार दिला आता दादा कोंडकेयांच्या पुढे पडलेला मोठा प्रश्न की दुसऱ्या हवलदाराची भूमिका कोण साकारणार. निळू फुले यांनी पात्र साकारण्यास नकार दिला पण दादांच्या या प्रश्नच उत्तर देखील निळू फुले यांनीही त्यांना दादांना अशोक सराफ हे नाव सुचवलं. या आधी नंदकिशोर कलगुटकर नंतर निळू फुले आणि अरुण कर्नाटकी या सगळ्यांनी दादांपुढे अशोक सराफ हेच नाव ठेवलं आणि दादांनी अशोक सराफांना कास्ट केलं आणि पुढे चित्रपटात जे घडलं ते आजतागायत आपल्या सर्वांना ठाऊक आहेच.
हे देखील वाचा- कोणतही काम पाहिलं नसताना ‘किती पैसे घेणार? जेव्हा दादा कोंडके मामांना हा प्रश्न विचारतात….
निळू फुले यांनी न साकारलेली भूमिका अशोक सराफ सराफ यांच्या खांद्यावर आली आणि महाराष्ट्राच्या लाडक्या मामांनी ती लीलया पेलली देखील. निळू फुले यांच्या सारख्या मोठ्या अभिनेत्यानं अशोक सराफ यांचं नाव सुचवणं ही त्याकाळी अशोक सराफ यांच्या साठी मोठी पर्वणीचं ठरली असेल.