Bigg Boss Marathi 5 episode : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात कलाकारांसह सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरलाही खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. या पर्वात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. कोकण हार्टेड गर्ल अंकिताच्या मालवणी भाषेचे लाखो दिवाने आहेत आहेत. अंकिताचे मालवणी भाषेतील व्हिडीओ, गाऱ्हाणे हे सार तिची खासियत आहे. मूळच्या कोकणातील असलेल्या अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सध्या अंकिता ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे.
अगदी ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनच्या पहिल्या कॅप्टनचा मानही कोकणकन्येला मिळाला. हे पाहून समस्त कोकणवासी खूप खुश होते. ‘बिग बॉस’ मध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे हे साऱ्यांना ज्ञात आहे. दरम्यान ‘बिग बॉस यांनी स्पर्धकांना नुकत्याच दिलेल्या टास्कमध्ये बेबीसह मराठी भाषा बोलायची असते. यावेळी अंकिता बाळाला घेऊन बसलेली असते. तेव्हा ती मालवणी भाषेचा उच्चार करते. टास्कमध्ये हे चालणार नाही, मालवणी भाषा मराठी नाही आहे असं निक्की, वैभव यांचं म्हणणं असून त्यांच्याकडून मालवणी भाषेचा अपमान झालेला पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता बाळाला घेऊन बसलेली असते. तेव्हा तिथे वैभवही असतो. अंकिता ‘बिग बॉस’ला प्रश्न विचारते, “मालवणी बोललेलं नाही चालणार का?, माझो झील मालवणी नाय बोलतलो तर कोणाचो बोलतलो. पण ही मराठीची उपभाषा आहे. ए वैभव सांग ही भाषा चालणार नाही का?”, असं ती म्हणते. तितक्यात वैभव तिथून उठून बाहेर येतो आणि “मालवणी भाषेचा उपयोग झालेला आहे”, असं म्हणतो. यावर अंकिता म्हणते, “अरे मी पाणी पीत आहे. अजून टास्क चालू कुठे झाला आहे”, असं म्हणत बाहेर येते. तेव्हा वैभव म्हणतो, “मालवणी भाषेचा उपयोग झाला आहे”.
आणखी वाचा – घरी जाण्यासाठी योगिताचा Bigg Boss कडे हट्ट, शोमधील त्रास अभिनेत्रीला सहन होईना, एक्झिट घेणार का?
यावर निक्की म्हणते, “मालवणी बोलायचं असं कुठे लिहिलं आहे. मालवणी नॉन-महाराष्ट्रीयन भाषा आहे. बेबीला मालवणी नाही समजत”. अशाप्रकारे निक्की, वैभव कडून मालवणी भाषेचा अपमान झालेला पाहायला मिळत आहे. त्याचं हे वक्तव्य अनेकांना खटकलं असून प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.