शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निक्की झाली Bigg Boss Marathi च्या घराची नवी कॅप्टन, अरबाजनेच तिच्याकडे जबाबदारी सोपवली कारण…; मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2024 | 10:19 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5

यंदाच्या आठवड्याचा कॅप्टन पदाचा मान मिळाला निक्की तांबोळीला, कारण समोर

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’चं घर म्हटलं की केव्हा काय होईल याचा थांग पत्ताही नसतो. क्षणात सुरळीत चालणाऱ्या गोष्टी क्षणार्धात बिघडतात. स्पर्धकांचे वागणं, बोलणं, चालणं हे अनेकांना खटकताना दिसत. स्पर्धक मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात मात्र वेळोवेळी ‘बिग बॉस’ त्यांचे कानही धरताना दिसतात. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात फक्त कलाकार मंडळीच नव्हे तर रॅपर, गायक, रील स्टार अशी काही मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे.

वादग्रस्त शो पैकी एक असलेल्या या शोची ओळख असून हा शो विशेष चर्चेत असतो. यंदाच्या या नव्या पर्वात नुकत्याच झालेल्या सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान साऱ्यांनाच एक धक्का मिळाला. यंदाच्या या आठवड्याचं कॅप्टनपद हे अरबाज पटेलला मिळालं होतं. अरबाजला कॅप्टनपद मिळाल्यानंतर तो काहीसा बदललेलाही दिसला असं घरातील स्पर्धकांनी मतही व्यक्त केलं. अरबाज कॅप्टन असताना सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांना त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून घरातील सर्व वस्तू या त्यांना विकत घ्यावा लागतील शिवाय बेड व वॉशरूमही त्यांना वापरता येणार नाही यासाठीही त्यांना किंमत मोजावी लागेल असं सांगितलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी अपमान आता ढसाढसा रडत, हात जोडून जान्हवीने पॅडीची मागितली माफी, म्हणाली, “रागाच्या भरात बोलली पण…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणि ही किंमत ‘बिग बॉस’ यांनी वाढवून ठेवली होती त्यामुळे सर्वांसमोर खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला. यावर तोडगा म्हणून ‘बिग बॉस’ यांनी अरबाज पटेलला एका रूम मध्ये बोलावलं आणि त्याच्यासमोर एक डिलेमा ठेवला की दोन लाख रुपयाची करन्सी किंवा कॅप्टनपद यापैकी काहीही एक स्वीकाराव आणि करन्सी घेतली तर ते कॅप्टनपद इतर कोणत्याही स्पर्धकाला त्यांने दान करावं. अरबाजसमोर खूप मोठा प्रश्न होता जर कॅप्टनशी गेली तर आपली इम्युनिटी ही जाईल हा टांगती तलवार त्याच्यावर होती अशावेळी अरबाजने कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आणि घरातल्यांचा विचार करुन त्याने करन्सी घेण्याचा विचार केला.

आणखी वाचा – “तुझीच ओव्हारएक्टिंग संपेल जेव्हा…”, जान्हवीने पॅडीला डिवचल्यानंतर सिद्धार्थ जाधव स्पष्टच बोलला, म्हणाला, “जोकरचा संयम…”

त्यावेळी अरबाज कॅप्टनपद सोडतो आणि वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून निक्कीला कॅप्टन्सी देतो. तो २ लाख बीबी करन्सीची निवड करतो. अशाप्रकारे निक्की घराची नवीन कॅप्टन ठरते आणि तिला इम्युनिटीही मिळते. अरबाजने निक्कीला कॅप्टन्सी देऊन तिला तिच्या वाढदिवसाचं खास गिफ्ट दिलं.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5nikki tamboli captain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update Pandharinath aka Paddy Kamble daughter Grishma shared post on Janhavi Killekar insulting actor

Bigg Boss Marathi : "तुझ्या पातळीला उतरणं माझ्या बाबाला...", पॅडी कांबळेच्या लेकीने जान्हवीला सुनावलं, निक्कीची सावली आहे असंही म्हणाली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.