सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. विशेषतः कोकणात गणेशोत्सवाची धमाल मस्ती पाहायला मिळते. कोकणात गणेशाच्या आगमनाची एक वेगळीच मज्जा असते. मुंबईहून चाकरमानी कोकणात जातात. गणेशोत्सव येण्याआधीच त्यांना गावाकडे येण्याची ओढ लागून राहिलेली असते. मराठी मनोरंजनविश्वात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी कोकणातली आहेत. कोकणात जाऊन तेथील बरेच फोटोस व्हिडीओ ते नेहमीच सोशल मिडीयावरून शेअर करत असतात. (Nikhil Bane On Ganeshotsav)
असाच कोकणकर नेहमीच कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचे फोटो व्हिडीओ पोस्ट करत असतो तो म्हणजे अभिनेता निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून निखिल बनेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेतील त्याचे विनोदी स्किट्स साऱ्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीसही पडतात. निखिलचं कोकणावर विशेष प्रेम आहे. त्याने शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओवरून हे नेहमीच कळते. अशातच निखिलने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निखिलने कोकणाकडे रवाना होतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
” चाकरमानी निघाले, आम्ही झो जाताव पुढ, तुम्ही या मागना, आतुरता आगमनाची” असे म्हणत त्याने गावाला जातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी हे मुंबईकर निघाले आहेत. निखिलही गणेशोत्सवासाठी कोकणात जायला उत्सुक असल्याचं दिसतंय. निखिलने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यानी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी कोकणात जाणारे रस्ते खराब आहेत, त्यामुळे सावकाश जा अशा सूचना निखिलला दिल्या आहेत.
निखिल बनेच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “चाकरमानी निघाले म्हणून रस्त्याची काम करावी लागत आहेत. या कोकणी राजकारणी लोकांकडे एरव्ही इतका वेळ असतो तेव्हा त्यांना आठवण होत नाही. आम्ही आपले त्याच खड्यातून ये जा करतोय. दुर्देव आहे कोकणाचे. (या मध्ये राजापूर पासून पुढे रस्ता खूप मस्त आहे). तर आणखी एका युजरने, “कित्ती छान. अशीच आपली संस्कृती परंपरा जपून पुढे जा.” असं म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने काळजी व्यक्त करत, “सावकिस जा, नाय रस्ते खराब हा ना” असं म्हटलं आहे.