मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. तिने आजवर बऱ्याच चित्रपटांत काम करत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून लांब असलेली पाहायला मिळतेय. क्रांती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विशेष म्हणजे ती तिच्या दोन जुळ्या मुलींचे व्हिडिओ व फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. झिया व झिदा अशी तिच्या लेकीची नाव आहेत. मात्र प्रेमाने ती त्यांना छबिल व गोदो बोलताना दिसते. (Kranti Redkar Answers To Trollers)
क्रांती तिच्या लेकींबरोबरचे अनेक व्हिडीओ नेहमीच चाहत्यांसह शेअर करत असते. मात्र अद्याप तिने तिच्या लेकींचे चेहरे प्रेक्षकांना दाखवले नाहीत. आजवर ती चाहत्यांसह लेकींचे व्हिडीओ शेअर करताना पाठमोऱ्या अंदाजातच करताना दिसते. त्यांच्या सुरक्षतेसाठी ती असं करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान अनेक शाह्यांनी लेकीचा चाहता पाहण्याची इच्छा ही व्यक्त केली आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त नुकतीच एक क्रांतीने पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत तिने तिच्या घरी कन्या पूजन ठेवलं होत. यावेळी तिने काही लहान मुलींना घरी बोलावून त्यांचं आदरतिथ्य केलं. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून तिने शेअर केला आहे. क्रांतीसह तिच्या दोन्ही मुलींनीही आलेल्या कन्यांची पूजा करत त्यांचा आशीर्वाद घेतला असं व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे.


या व्हिडिओमध्ये क्रांतीने तिच्या दोन्ही मुलींचे चेहरे दाखवले नसून इतर आलेल्या मुलींचे चेहरे दाखवले असल्यावरून चाहत्यांनी कमेंट करत खडेबोल सुनावले आहेत. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “मॅडम तुम्ही स्वतःच्या मुलींचे चेहरे दाखवले नाही आणि इतर मुलींचे व्हिडीओ काढून त्यांचे चेहरे दाखवताय तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. पूर्ण व्हिडिओ मध्ये स्वतःच्या मुलींचे बॅकसाईडने व्हिडिओ घेतला शोभत नाही तुम्हाला”, यावर उत्तर देत क्रांती म्हणाली आहे की, “मुलीचे आई वडीलच काढत होते व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी. काळजी नसावी. आणि छबिल गोदोला सांभाळायची जबाबदारी तुम्ही घेता का? विथ ऑल द थ्रेटस, तर मी दाखवते चेहरे निदान व्हिडिओची भावना तरी समजून घ्या. सारखं आपलं तत्वज्ञान झाडू नये. नकारात्मक राहू नका”.