मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे. हिंदी विवाह सोहळ्यांमध्ये बांधण्यात येणार पवित्र व मंगल सूत्र धागा म्हणजे मंगळसूत्र. अलीकडच्या काळात वेगवगेळ्या डिझाइन्सच्या मंगळसूत्राची क्रेज आहे. मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीचे प्रतीक मानले जाते. मंगळसूत्र बांधण्याची प्रथा हिंदूंव्यतिरिक्त इतर धार्मिक गटांमध्येही रुजली आहे. सध्या विविध डिझाइन असलेल्या मंगळसूत्राची क्रेझ असताना कलाकारांच्या मंगळसूत्राच्या डिझाइनची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. (Alka Kubal Mangalsutra Design)
एकामागोमाग एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकत असून त्यांच्या मंगळसूत्राच्या डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच नुकत्याच झालेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यामधील एका अभिनेत्रीच्या मंगळसूत्राच्या डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सालस, सोज्वळ, सोशिक, घरेलू टाईप अशा स्वभावात मोडणारी मराठी सिनेमाविश्वातील नामवंत अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात अलका कुबल यांनी पारंपरिक अंदाजात हजेरी लावली होती.
अलका कुबल यांच्या या सोहळ्यातील पारंपरिक अंदाजाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी अलका यांनी लाल रंगाची काठापदराची साडी नेसली होती. यावेळी अलका यांच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. खास पारंपरिक टच असलेल्या या मंगळसूत्राच डिझाइन लक्षवेधी ठरलं. जास्तीत जास्त काळेमणी असलेल्या या मंगळसूत्राचं पेंडंट खूप खास होतं. चौकोनी आकाराचं हे सोन्याचं पेंडंड खास दिसत होतं.
सिनेसृष्टीत अलका यांनी एक काळ गाजवला आहे. अलका यांनी ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटातून सिनेमासृष्टीत पदार्पण केलं. ‘माहेरची साडी’ या चित्रपटानंतर अलका यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आजही त्या ‘माहेरची साडी’ चित्रपटातील भूमिकेमुळे ओळखल्या जातात. अलका यांना साड्यांचं प्रचंड वेड आहे. साड्यांवरील त्याच्या या प्रेमाबाबत त्यांनी बरेचदा भाष्य केलं आहे. विशेषतः अलका या पारंपरिक अंदाजातच कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात.