Ajit Pawar Last Rites : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित दादा पवारांना अखेरचा निरोप द्यायला जनसमुदाय लोटला आहे. अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी शिवाय अनेक कलाकार मंडळींनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अजित पवारांना पुष्पचक्र वाहत राजकीय नेत्यांनी तसेच कलाकार मंडळींनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्टेजवर अभिनेता अमोल कोल्हे आणि अभिनेता रितेश देशमुख दोघांची उपस्थिती पाहायला मिळाली. अजित दादांना शेवटचं पाहायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला हे दोन्ही कलाकार उपस्थित होते. यावेळी दोघेही भावुक झाल्याचं दिसलं.
अमोल कोल्हे आणि रितेश देशमुख यांनी अजित दादांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मुलांची म्हणजे पार्थ आणि जय पवारची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिलेले कठोर प्रशासक, धडाडीचा नेता आणि खऱ्या अर्थाने मास लीडर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar death) यांचे बुधवारी दिनांक २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाले होते. बारामती येथील गोजुबावी येथे लँडिंगच्यावेळी त्यांचे विमान कोसळले होते.
विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आणि अजित दादांना शेवटचं पाहण्यासाठी जनसमुदाय लोटला आहे.





