शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आत्मचरित्र वगैरे असं काही नसतं”, नयना आपटेंचं स्पष्ट विधान, म्हणाल्या, “कलाकारांनी आपले अनुभव…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 24, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nayana Apte talked about her autobiography see the details

“आत्मचरित्र वगैरे असं काही नसतं”, नयना आपटेंचं स्पष्ट विधान, म्हणाल्या, “कलाकारांनी आपले अनुभव...”

आपल्या समर्थ अभिनयाने आणि सुंदर गायनाने शांता आपटे यांनी रूपेरी पडद्यावर राज्य केले. ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे यांचा हाच वारसा वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनीही मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपली कारकीर्द घडवली. नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रातून नयना आपटे यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.  वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून नयना आपटेंनी मराठी, हिंदी व गुजराती चित्रपट आणि रंगभूमीवर अभिनय करत विविधांगी भूमिका साकारल्या. त्याचबरोबर बदलत्या काळाप्रमाणे होणारे अनेक बदल स्वीकारत मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये टिकून राहत त्यांनी आपली यशस्वी वाटचाल आजही सुरूच ठेवली आहे.

‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या रंगभूमीय कारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या गुणी अभिनेत्रीला मानवंदना तसेच त्यांच्या कारकीर्दीच्या सन्मानार्थ मुंबईत ‘अमृतनयना’ या विशेष सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने नयना आपटेंनी ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांना तुमच्या आत्मचरित्रात तुमच्या भूमिका, तुमचा अभिनय व तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेमकं काय मांडलं आहे असा प्रश्न विचारण्यात आला.

याचे उत्तर देत नयना आपटे यांनी असं म्हटलं की, “कलाकारांनी आत्मचरित्र वगैरे लिहू नये असं मला वाटतं. आत्मचरित्र न लिहिता कलाकारांनी आपले अनुभव लिहावेत. आत्मचरित्र लिहून काय करायचं आहे? प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार हे असतातच. त्यात विशेष असं काय आहे. मोठं होण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. त्यामध्ये विशेष असं काही नाही. अनुभव लोकांसमोर ठेवले पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला जर काही संशोधन करायचे असेल तर त्यादृष्टीने ते पुस्तक वाचतील. त्यासाठी मी हे केलं.”

आणखी वाचा – प्रथमेश परबच्या बायकोच मंगळसूत्र आहे खूपच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा, डिझाइनने वेधलं लक्ष

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आत्मचरित्र वगैरे असं काही नसतं. वाचणाऱ्याला वाटतं असतं की ते आत्मचरित्र आहे. त्यामुळे आपण अनुभव लोकांसमोर ठेवले पाहिजेत. म्हणजे ते लोकांच्या उपयोगी येतील. आपण एक संपूर्ण पंचपक्वानाने परिपूर्ण असलेलं ताट लोकांसमोर मांडायचं. त्यातलं लोकांना जे जे आवडेल ते ते घेतील”.  

आणखी वाचा – लग्न लागताच बायकोच्या पाया पडला प्रथमेश परब, पत्नीनेही नमस्कार केला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान, १९६५ सालापासून नयना आपटे यांची व्यावसायिक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू झाली आणि ती आजवर सुरुच आहे. तसेच नयना आपटे यांनी आजवर ६० हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संगीत आणि काही गुजराती नाटकांतून भूमिका साकारल्या आहेत.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsNayana Apteनयना आपटेमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Siddharth Bodke And Titeeksha Tawde Wedding

तितीक्षा तावडेच्या हातावर रंगली सिद्धार्थ बोडकेच्या नावाची मेहंदी, नवरीबाईचा उत्साह, जय्यत तयारी अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.