झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. वेगळ्या धाटणीचे कथानक आणि कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एजे व लीला यांच्यामधील कुरबुरी असो किंवा लीला व तिच्या सुनांमधील छोटी-मोठी भांडणं असो, लीलाच्या वडिलांचं तिच्यावरील प्रेम असो किंवा आजीचं तिला समजावून घेणं असो; प्रेक्षकांना ही मालिका भुरळ घालते. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. (Navri Milee Hitlerla serial update)
अशातच काही दिवसांपूर्वी लीलाला जहागीरदारांच्या घराची जबाबदारी देण्यात आली आहे. आजीने लीलाला संपू्र्ण घराची जबाबदारी दिली आहे. मात्र लीलाला ही जबाबदारी नीट पेलता येत नसल्याने एजे व तिच्यात पुन्हा संघर्ष निर्माण होणार का? हे पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या प्रोमोमध्ये आजींना चक्कर आली होती. त्यानंतर त्या जमिनीवर बेशुद्ध होऊन पडतात. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या घरी येतात व आजींना हाक मारतात. पुढे त्यांना आजी जमिनीवर पडलेल्या दिसतात. यानंतर तिघी सूना लीलाला जाब विचारतात.
आणखी वाचा – Video : ‘सातव्या मुलीची…’ला निरोप देताना ढसाढसा रडली तितीक्षा तावडे, सेट विस्कळीत केल्यानंतर कलाकारांना दुःख
मालिकेच्या याच कथानकाला अनुसुरून आणखी एक प्रोमो समोर आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये सूना लीलाला म्हणतात की, “आज सर्वांना कळेल की तुम्ही किती बेजबाबदार आहात. दुर्गा वाहिनीच्या हातात घराची जबाबदारी असताना त्या सर्व काही नीट करायच्या”. यानंतर लीला येतात आणि तेव्हा डॉक्टर आजींना तपासतात आणि सांगतात की, त्यांना बीपीकहा त्रास आहे, त्यात दुपारच्या गोळ्या चुकल्या आहेत”. यानंतर तिघी एजेंना लीलाला घराबाहेर काढण्यासाठी सांगतात.
आणखी वाचा – ‘पारू’ मालिकेच्या सेटवर ‘असा’ साजरा झाला प्रसाद जवादेचा वाढदिवस, बायकोने दिलं खास सरप्राइज, व्हिडीओ व्हायरल
त्यामुळे आता आजीच्या बिघडलेल्या तब्येतीसाठी एजे लीलाला जबाबदार धरणार का? लीला स्वत:ला या संपूर्ण प्रकरणात निर्दोष सिद्ध करेल का? किंवा एजे लीलाला माफ करणार? आणि मालिकेत पुढे काय काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे पुन्हा एजे व लीला यांच्या नात्यावर काय परिणाम होणार? याचीही प्रेक्षक वाट बघत आहेत.