Rashmi Desai Casting Couch : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचशी संबंधित किस्से वेळोवेळी कानावर येत असतात. हा कास्टिंग काऊचचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने एक मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा एक आश्चर्यकारक अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्री रश्मी देसाईने ‘उत्तरन’ या मालिकेमुळे घराघरात आपले नाव निर्माण केले आहे. रिॲलिटी शोबद्दल बोलायचे झाले तर ती ‘बिग बॉस १३’ मध्येही दिसली आहे. सिद्धार्थ शुक्लाबरोबरच्या भांडणामुळे त्या पर्वात अभिनेत्री चर्चेत आली.
रश्मी विशेषतः करिअर व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विषयांवर मोकळेपणाने बोलताना दिसते. यावेळी रश्मीने वयाच्या १६ व्या वर्षी झालेल्या तिच्या दुर्दैवी कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत रश्मी देसाईने सांगितले की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचा आश्चर्यकारक अनुभव आला होता. याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला, ज्याबद्दल मी अनेकदा बोलले आहे. जेव्हा मला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आणि मी जाऊन पाहिले तर त्या माणसाशिवाय तिथे कोणीच नव्हते”.
आणखी वाचा – निक्की तांबोळी व अरबाज पटेलची हिमाचल प्रदेशात धमाल-मस्ती, एकत्र करत आहेत एन्जॉय, फोटो व्हायरल
याबद्दल बोलताना रश्मी देसाई म्हणाली, “मी १६ वर्षांची असताना त्याने मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण मी काही तासांतच तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले”. टीव्ही अभिनेत्री रश्मीनेही सांगितले की, तिने संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिनेत्री तिच्या आईसह त्या व्यक्तीकडे गेली आणि तिच्या आईने त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी त्याच्या कानाखाली मारली. ही घटना अनेक वर्षांपूर्वी घडली असली तरी ती आजही तिच्या मनात ताजी असल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाईची ओळख करुन देणं गरजेचं नाही. अभिनेत्रीने ‘परी हूं मैं’, ‘रावण’, ‘उत्तरन’, ‘बिग बॉस’ आणि ‘नच बलिए’ यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. याबरोबरच रश्मीने वेबसीरिज आणि अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.