Tula Pahata Teaser Launch : ऐन तारुण्यात, प्रेमात आकंठ बुडालेले असताना तो अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो आणि काही वर्षांनी तसाच अचानक परततो तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून.. त्याच्या अचानक जाण्यानं आणि पुन्हा परतण्यानं तिच्या आयुष्यात काय खळबळ उडते त्याची तरल कहाणी तुला पाहता या चित्रपटातून उलगडणार आहे. १० जुलैला हा चित्रपट मराठीसह हिंदीतही प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे.
दुसऱ्यांदा आई झाली सुप्रसिद्ध अभिनेत्री, नावंही केलं जाहीर, आता मात्र अभिनयापासून आहे दूर
ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी “तुला पाहता” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन ही मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री इला भाटे, निशिगंधा वाड, मानसी पाटील, नचिकेत लेले, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे. (Tula Pahata Teaser Launch)
कुटुंबांतील वेगवेगळ्या पिढ्यांची गोष्ट आता ‘तुला पाहता’ या चित्रपटातून उलगडणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा तरुण एक जोडपं असतं तेव्हा काय काय घडतं याची रंजक गोष्ट “तुला पाहता” या चित्रपटातून उलगडणार आहे. एका तरल प्रेमकहाणीची झलक टीजरमधून दाखवण्यात आली आहे. पण या टीजरपलीकडेही या चित्रपटाच्या कथेत आणखी अनेक पदर आहेत. हे पदर ट्रेलरमधून आणखी काही प्रमाणात उलगडतील अशी अपेक्षा आहे. चित्रपटाचा पोत, छायांकन, पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाचा गुणवत्तापूर्ण स्तर दिसून येतो. (Tula Pahata Teaser Launch)
ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीला लागली हळद, साधेपणाची चर्चा
चित्रपटाच्या पोस्टर, त्यातील कसदार अभिनेत्यांच्या फळी यामुळे ‘तुला पाहता’ हा चित्रपटाविषयीची उत्सुकता आता टीजरमुळे आणखी वाढली आहे. एक नवा दृष्टिकोन घेऊन प्रेक्षकांसमोर येणारा हा चित्रपट पाहण्यासाठी १० जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Tula Pahata Teaser Launch)

