शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बिचारी लीला आता…”, लग्नानंतर एजेचा लीलावर फसवणूकीचा आरोप, प्रेक्षकांनी घेतली तिचीच बाजू, म्हणाले, “लग्न झालं मग हरकत काय?”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Navri Mile Hitlerla marathi serial Netizens expressed their mixed reactions on promo

"बिचारी लीला आता...", लग्नानंतर एजेचा लीलावर फसवणूकीचा आरोप, प्रेक्षकांनी घेतली तिचीच बाजू, म्हणाले, "लग्न झालं मग हरकत काय?"

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत नुकताच एजे व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मात्र एजे व श्वेताऐवजी एजे व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टने मालिकेत चांगलीच रंगत आणली.

अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एजेला त्याचं लग्न श्वेताऐवजी लीलाशी झालेले कळत आहे. त्यामुळे तो तिच्यावर भयंकर चिडल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय लीला तिला तिच्या बहिणीच्या काळजीपोटी एजेशी लग्न करावे लागले असल्याचे समजावून सांगते. मात्र एजेला लीलावर विश्व बसत नाही. त्यामुळे एजे लीलाला तने त्याचा विश्वासघात केल्याचे बोलतात. तसेच यावेळी एजे लीलाला “माझी चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला” असं म्हणतात.

आणखी वाचा – आदित्यला दुखापत झाल्यानंतर पारूने रडत सांगितली तिच्या मनातली गोष्ट, अहिल्यादेवींना दामिनी दोघांविषयी भडकवणार, पुढचा निर्णय काय?

या प्रोमोवर प्रेक्षकांनी आपल्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट करत “सगळे लीलाला बिचारी म्हणतात. ती आहेच पण एजेही बिचारा आहे. आधी त्याला लग्नाचं करायचं नव्हतं, नंतर पहिल्या बायकोच्या शेवटच्या इच्छेने आणि आईसाठी त्याला लग्न करावं लागलं. पण मग जिच्याशी लग्न करायचं ठरलं, तिला करायचं नव्हतं, आता तडजोड म्हणून श्वेताशी लग्न ठरवलं तर परत आयुष्यात लीलाच आली.” तर आणखी एकाने “तशी त्या एजेशी श्वेताचं काहीच बोलणं किवा दोघांमध्ये काहीच संवाद होत नव्हता. ते लीला एजे एकमेकांना ओळखतात, त्यांच्यात छान मैत्रीही आहे मग त्यांचं लग्न झालं तर काय हरकत आहे” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – अर्जुन कायमचा दूर जाणार असल्याची अप्पीला भीती, साखरपुडा झाल्यानंतर सगळ्या अपेक्षाच सोडल्या, पुन्हा प्रेम मिळवण्यासाठी धडपड

दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी लीलासाठी वाईट वाटतं असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या लग्नावरुन मालिकेच्या निर्मात्यांना व दिग्दर्शकाला ट्रोलही केलं आहे. मालिकेत लीला एजे यांच्या लग्नानंतर पुढे काय पाहायला मिळणार? यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsNavri Mile Hitlerla
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Rishi Saxena's entry in the serial Aai Kuthe Kay Karte netizen made a rude comment and actor also responded to it.

"दुसरा नवरा बनून नको येऊ", 'आई कुठे...'मधील ऋषी सक्सेनाच्या एण्ट्रीवर नेटकऱ्याची खोचक कमेंट, अभिनेता म्हणाला, "नवरा बनून..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.