सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग असून सर्वच क्षेत्रात सध्या AI चाही वापर होत आहे आणि या AI चा मनोरंजन क्षेत्रातही शिरकाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान हे जसे फायद्याचे असते तशीच ती एक चिंतेची बाबदेखील आहे. यावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने भाष्य केले आहे आणि ही मराठी अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे. शर्मिला सध्या झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती दुर्गा जहागिरदार ही भूमिका साकारते आहे.
शर्मिला ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तीची एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्री AI तंत्रज्ञानावर भाष्य केलं आहे. तसेच तिने या पोस्टद्वारे कलाकारांच्या कास्टिंगविषयी कळकळीची विनंती केली आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये तिने AI वापरुन तयार केल्या जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मोठ्या पडद्यावर साकारण्याविषयीही भाष्य केले आहे.

या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “कृपया AI चा वापर टाळा आणि हाडामांसाचे कलाकार कास्ट करा”. AI ला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एकसारखे दिसणारे कलाकार सापडतील. मी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट बघितलेला नाही, पण कौतुक ऐकलं आहे की, बाबूजींच्या चित्रपटामधल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे व आदिश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपखल बसलं आहे”.
तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्येही तिने “एखाद्या पात्राचं तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला AI कशाला हवं आहे? कला व कलाकार अजून जिवंत आहेत. काही विशेष किंवा अपरिहार्य परिस्थितीमध्ये गरजेपुरता आणि मर्यादित वापर हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतो.” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – “नशिबाने अशी पलटी मारली की…”, लीला-ऐजेचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, म्हणाला, “लीला दिसते बरी पण…”
दरम्यान, या पोस्टद्वारे शर्मिलाने कोणत्या चित्रपट, मालिका व कलाकारांचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र तिने या पोस्टद्वारे काहींवर निशाणा साधला आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.