‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत असलेली पाहायला मिळत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत राकेश बापट हा तगडा कलाकार मराठी मालिकेतून पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारत आहे. तर त्याच्याबरोबर लीला हे पात्र अभिनेत्री वल्लरी लोंढे साकारताना दिसत आहे. वल्लरीने तिच्या अभिनयाने लीला हे पात्र सुंदर वठवलेले पाहायला मिळत आहे. वल्लरीने याआधी अनेक मराठी तसेच हिंदी मालिकेतून काम केले आहे. तसेच ‘कन्नी’ या मराठी चित्रपटातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. (Vallari Londhe Look)
अगदी कॉलेजपासून वल्लरीला अभिनयाची आवड आहे. सध्या वल्लरी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून लीला हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. मालिकेत एजे व लीला यांचा प्रवास पाहणं रंजक ठरत आहे. सध्या मालिकेत एजे व लीला यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. या मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री वल्लरी नेहमीच सोशल मिडियावरही सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
मालिकेत अत्यंत साधी, सरळ दिसणारी वल्लरी नेमकी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटोंवरुन कळतंय. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या स्वभावाची दखल घेणारे अनेक फोटो पाहायला मिळतील. अभिनयासह वल्लरी नृत्यातही तरबेज आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे अनेक फोटो शेअर करताना दिसते. मालिकेत साधी भोळी राहणारी वल्लरी मात्र खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस राहत असल्याचं पाहायला मिळतं.
मालिकेतील वल्लरी खऱ्या आयुष्यात खूपचं सुंदर दिसत असून तिच्या ग्लॅमरस व हटके लूकमधील फोटो कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. बरेचदा वल्लरीचे हॉट अंदाजातील फोटोशूटचे फोटोही अनेक तरुणांना घायाळ करतात. वल्लरीची फॅशनही नेहमीच खास व ट्रेंडिंग असलेली पाहायला मिळाली आहे.