शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hilerla : लीलाकडून यश आणि रेवतीचे लग्न लावण्याचे वचन, पण एजेंचा निर्णय काही वेगळाच, मालिका नव्या वळणावर

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 15, 2024 | 6:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerala serial update Leela promised marriage to Yash and Revathi and AJ take decision regarding them.

Navri Mile Hitlerala मालिकेत लीलाकडून यश व रेवतीला लग्नाचे वचन, तर एजेही घेणार मोठा निर्णय

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीला व एजे यांची दिवाळी साजरी केल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. सगळं काही नीट चालेलेलं असताना आणि एजे व लीला यांच्यात आता कुठे तरी प्रेम बहरत असतानाच एजेंवर मोठं संकट आलं आणि हे संकट म्हणजे एजेंची अटक. (Navri Mile Hitlerala Serial Updates)

श्वेता एजेंसमोर विष प्यायल्याचं नाटक करते, ज्यामुळे एजेला अटक होते. ही बातमी कळताच लीला ठरवते की ती काहीही करून एजेची सुटका करणार. लीला रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबते. ती ठरवते की श्वेताविरुद्ध सगळे पुरावे गोळा करायचे आणि एजेची सुटका करायची. त्यानुसार लीलाने एजेंची सुटका केली आहे. मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागात लीलाने एजेंणा दिलेला तिचा शब्द पाळला आहे आणि त्यांची सुखरूप सुटका करुन त्यांना घरी आणलं आहे. अशातच आता मालिकेला आणखी एक नवीन वळण आलं आहे ते म्हणजे रेवतीच्या लग्नाचे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – चार वर्षांनी शशांक-मृणाल यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष, चाहतेही खुश

लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं आहे पण एजेंच्या मनात काही वेगळच आहे याचाच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये लीला यश व रेवती यांना माझा होकार आहे असं म्हणते. इतक्यात कालींदी येते माझं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहेस. माझी मुलगी एका मोठ्या घरात सून म्हणून जाणार आहे”. पुढे एजे यशला असं म्हणतात की, “मी यशच्या बाबतीत माझ्या पद्धतीने निर्णय घेतला तर चालेल का?” यावर यश म्हणतो की, “हो नक्कीच चालेल”. दुसरीकडे कालिंदी लीला सक्त ताकीद देत असं म्हणते की, “एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे यश आणि रेवूच लग्न व्हायलाच पाहिजे”.

आणखी वाचा – लोकप्रिय बॉलिवूड गायकाच्या कॉन्सर्टसाठी तेलंगणा सरकारकडून नोटीस, ‘या’ गाण्यांवर घातली बंदी, नेमकं असं काय झालं?

त्यामुळे आता एकीकडे लीलाने यश व रेवतीला त्यांच्या लग्नाचे वचन दिले आहे. तर दुसरीकडे एजेंनी यशच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एजेंनी यशच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय या लीलाच्या वचनाआड येणार का? हे मालिकेच्या आगामी भागांमधुन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  

Tags: Marathi Serial NewsNavri Mile Hitlerala Marathi SerialNavri Mile Hitlerala Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
kareena kapoor instagram post

करीना कपूरने आपल्या मुलांना दिली आहे 'अशी' शिकवण व संस्कार, पोस्टही केली शेअर, म्हणाली, "जगात सर्वश्रेष्ठ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.