झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीला व एजे यांची दिवाळी साजरी केल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. सगळं काही नीट चालेलेलं असताना आणि एजे व लीला यांच्यात आता कुठे तरी प्रेम बहरत असतानाच एजेंवर मोठं संकट आलं आणि हे संकट म्हणजे एजेंची अटक. (Navri Mile Hitlerala Serial Updates)
श्वेता एजेंसमोर विष प्यायल्याचं नाटक करते, ज्यामुळे एजेला अटक होते. ही बातमी कळताच लीला ठरवते की ती काहीही करून एजेची सुटका करणार. लीला रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबते. ती ठरवते की श्वेताविरुद्ध सगळे पुरावे गोळा करायचे आणि एजेची सुटका करायची. त्यानुसार लीलाने एजेंची सुटका केली आहे. मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागात लीलाने एजेंणा दिलेला तिचा शब्द पाळला आहे आणि त्यांची सुखरूप सुटका करुन त्यांना घरी आणलं आहे. अशातच आता मालिकेला आणखी एक नवीन वळण आलं आहे ते म्हणजे रेवतीच्या लग्नाचे.
लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं आहे पण एजेंच्या मनात काही वेगळच आहे याचाच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये लीला यश व रेवती यांना माझा होकार आहे असं म्हणते. इतक्यात कालींदी येते माझं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहेस. माझी मुलगी एका मोठ्या घरात सून म्हणून जाणार आहे”. पुढे एजे यशला असं म्हणतात की, “मी यशच्या बाबतीत माझ्या पद्धतीने निर्णय घेतला तर चालेल का?” यावर यश म्हणतो की, “हो नक्कीच चालेल”. दुसरीकडे कालिंदी लीला सक्त ताकीद देत असं म्हणते की, “एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे यश आणि रेवूच लग्न व्हायलाच पाहिजे”.
त्यामुळे आता एकीकडे लीलाने यश व रेवतीला त्यांच्या लग्नाचे वचन दिले आहे. तर दुसरीकडे एजेंनी यशच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एजेंनी यशच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय या लीलाच्या वचनाआड येणार का? हे मालिकेच्या आगामी भागांमधुन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.