सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लालबागचा राजाच्या दर्शनावेळीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “योग्य वागणूक दिली नाही तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2024 | 1:00 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
sharmila shinde on Shocking Video of Lalbaugcha Raja Darshan

लालबागचा राजा मंडळातील वागणूक पाहून मराठी अभिनेत्रीची सूचक पोस्ट

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यातील काही नामांकित मंडळांमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावताना दिसतात. अशातच मुंबईत प्रशस्त व नावाजलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दुरुन येत रात्रं-दिवस लाईनमध्ये उभे राहताना दिसतात. इतकेच नव्हे तर कलाकार मंडळीही या ठिकाणी दर्शनासाठी येतात. दरम्यान, भाविकांचा जनशाच्या दर्शनासाठीचा प्रचंड उत्साह हा अनेकदा गालबोट लागणार ठरु शकतो. आणि हे अगदीच खरं आहे. कारण सध्या लालबागच्या राजाच्या मंडळातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (sharmila shinde on Shocking Video of Lalbaugcha Raja Darshan)

दर्शनासाठी गेलेल्या भक्तांना चुकीची वागणूक देत त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणं, धक्काबुक्की करणं हे अतिशय निंदनीय असून अशी घटना गणरायाच्या आवारात घडताना दिसली. बरं सर्वसामान्यांना याचा नेहमीच सामना करावा लागला आहे पण आता यात कलाकार मंडळीही भरडू लागले आहेत. नुकताच दर्शनावेळीचा वाईट अनुभव एका लोकप्रिय हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रीने शेअर केला. ‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप हिला लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी आलेला वाईट अनुभव थेट व्हिडीओ पोस्ट करत शेअर केला.

आणखी वाचा – धक्काबुक्की केली, फोनही हिसकावला अन्…; लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आला वाईट अनुभव, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sharmila Rajaram Shinde (@sharmilarajaramshindeactor)

सदर धक्काबुक्कीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला. आता या व्हिडीओवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही मौन सोडलं असल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री म्हणजे नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री शर्मिला शिंदे. शर्मिला शिंदेने याआधी ही अनेक न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं पाहायला मिळालं. आता लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी वाईट अनुभवाचा व्हिडीओ व्हायरल होताच शर्मिलाने पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – “रितेश सरांनी त्या मुलीला सांगितलं तरी…”, नात्याची कबुली देत अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडचा निक्कीला टोला, म्हणाली, “ब्रेकअप…”

शर्मिला पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी लहान होते तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतींचं दर्शन घडवायची. आम्ही सुद्धा गर्दीत चेंगरत चेंगरतच दर्शन घ्यायचो. पण, आता मी एक कलाकार आहे. मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते. इतरांनी ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही तिथे जाणं टाळा. देव सर्वत्र आहे. घरी बसून नमस्कार करा. आपला माणुसकीचा कोटा उच्च ठेवा. आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. त्यांची म्हातारपणी सेवा करा. माणसांसाठी आणि इतर प्राणिमात्रांसाठी मनात दया-माया असुद्या. दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा. बास. यापेक्षा मोठी भक्ती काय असेल. गणपती बाप्पा मोरया. तळटीप : जी मंडळं भाविकांना नीट वागवतात तिथे भाविकांनी सुद्धा सहकार्य करावे”.

Tags: Lalbaugcha Raja Darshan viral videomarathi actresssharmila shinde on Shocking Video of Lalbaugcha Raja Darshan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli, Vaibhav Chavan, Ankita Walawalkar, Abhijeet Sawant, Varsha Usgaonkar and Aarya Jadhav are nominated

Bigg Boss Marathi च्या घरातून नक्की कोण बाहेर जाणार? 'त्या' कृतीमुळे आर्या ठरणार का नॉमिनेशनची बळी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.