छोट्या पडद्यावरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेत येणाऱ्या अनेक रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. एजेंच्या व लीला यांच्या मनाविरुद्ध त्यांचं लग्न झालं आहे. मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मनाविरुद्ध सुरु झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी आता कोणतं वळण घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
एजे व लीला हे दोघे मालिकेत एकमेकांच्या विरुद्ध असले, त्यांचे मालिकेत एकमेकांबरोबर जमत नसले तरी ते पडद्यामागे खूपच मजामस्ती करतात. दोघे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात आणि ते अनेकदा त्यांचे पडद्यामागील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांची ही पडद्यामागची मजामस्ती चाहत्यांनाही चांगलीच आवडते. दोघे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लीला व एजे यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे दोघांचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – Video : नवऱ्याच्या ‘त्या’ वागण्यामुळे आरती सिंहचा राग अनावर, रागाच्या भरात केलं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये एजे व लीला यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एजे लीलाला आपल्या मिठीमध्ये घेत आहे. त्यांच्या या खास व्हिडीओमध्ये एजेनने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. तर लीलाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. सुंदर वेणी, गळ्यात मोठा नेकलेस त्यावर मोठे मंगळसूत्र, हातात लाल बांगड्या आणि केसांत पांढऱ्या रंगाचे फूल असा खास लुक केला आहे. दोघेही एकमेकांबरोबर खूपच सुंदर दिसत आहेत.
मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एजे व लीला यांनी हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे. या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “दोघेही खुप छान दिसत आहेत, किती गोड, तुमची मालिका खूप आवडते” अशा अनेक कमेंट्सद्वारे या व्हिडीओला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.