एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातही बरेच चढ उतार येत असतात. खाजगी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाना कलाकारालाही तोंड द्यावं लागत. बरेचदा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या प्रसंगावेळी इतर सहकलाकारही धावून जातात. एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची माणुसकी ही फार कमी पाहायला मिळते. एखाद्याच्या आयुष्यात काय चाललंय याच्याशी कोणालाही काही फरक पडत नाही मात्र ज्यावेळी त्या व्यक्तीला खरंच आधाराची गरज असते तेव्हा एखाद्याने चौकशी केली तर त्यात काही कमीपणा नसावा, हे हि तितकंच खरंय. असाच एक किस्सा एका ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितलाय.(Shivaji Satam and Nana Patekar)
पहा नाना पाटेकर आणि शिवाजी साटम यांच्या मैत्रीतला एक किस्सा (Shivaji Satam and Nana Patekar)
कुछ तो गडबड है हे वाक्य ऐकलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणाच्याही मनात नाव येईल ते एसीपी प्रद्युमन. आणि हेच नाव तोंडावर यायलाच हवं कारण आयुष्यातील २१ वर्ष अभिनेते शिवाजी साटम यांनी एकच शो म्हणजे सीआयडीवर घालवली आहेत. त्यामुळे त्यांची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही. स्क्रीनवर कडक दिसणारा, कडक वागणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात फारच मृदू आहे. त्यांची प्रेमकहाणी ही तितकीच हळवी होती. वडिलांनी सांगितलेल्या मुलीसोबत म्हणजे अरुणा साटम यांच्यासोबत शिवाजी साटम यांनी लगीनगाठ बांधली.
हे देखील वाचा – ‘माझ्या ट्रॉफीज हे दोनच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले आणि…’
२४ वर्ष एकमेकांसोबत सुखाचा संसार केल्यानंतर मात्र अरुणा यांनी शिवाजी यांची साथ सोडली. अरुणा यांचं कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्नीसोबत हे सर्व घडले तेव्हा शिवाजी साटम गुलाम-ए-मुस्तफाचे शूटिंग करत होते. या चित्रपटात नाना पाटेकर, अरुणा इराणी होते. हे कलाकार काही शिवाजी साटम यांचं कुटुंब नव्हते, पण ते कुटुंबापेक्षा कणभर कमीही नव्हते. या तीन महिन्यांत नाना पाटेकर आणि इतर कलाकारांनीही माझी खूप काळजी घेतली.(Shivaji Satam and Nana Patekar)

नाना पाटेकर हे एक अजब रसायन आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. रफ टफ वागणं बोलणं चालणं असेल तरी नारळासारखे बाहेरून कडक वाटणारे नाना हे आतून खोबऱ्यासारखे गोड आहेत. एखाद्याच्या कठीण वेळी धावून जाणे हे नानांना सांगण्याची गरज कधीच नाही भासली. गुलाम-ए-मुस्तफाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी शिवाजी साटम यांच्यावर ओढावलेलं दुःख जवळून पाहिलं. पत्नीच्या मृत्यूनंतर शिवाजी साटम यांना धीर देण्याचं काम नानांनी केलं.
हे देखील वाचा – हमीदाबाईची कोठी नाटकाचा प्रयोग आणि थिएटरमधून नाना आणि मामांनी काढला पळ
नाना पाटेकर आणि शिवाजी साटम यांनी ‘वजूद’, ‘यशवंत’, ‘योगपुरुष’, ‘अंधा युध’ या चित्रपटात एकत्र काम केलं.