मराठी पिक्चरचं “थिएटर डेकोरेशन” पाह्यला जाऊ या की….

(Poshter Boyz 2)
(Poshter Boyz 2)

तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, एकेकाळी पब्लिकला पिक्चर पाहण्याइतकाच भारी इंटरेस्ट सिंगल स्क्रीन थिएटर्सवरचे डेकोरेशन पाहण्यातही होता, तर आजची डिजिटल पिढी म्हणेल, त्यात इतकं ‘पाहण्यासारखं ‘ काय होतं? ते तर देखावे. पिक्चरमधले काही सीन्स त्यावर टाकलेले, त्यात काय पाहायचं?…. तर यावर उत्तर एकच, पब्लिकला पिक्चरकडे आकर्षित करण्याचा तो एक भारी फंडा होता. तेही एक कल्चरच. साऊथला कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील पिक्चर्सना ते  थिएटरवरच्या हीरोच्या भल्या मोठ्या कटआऊटच्या रुपाने, कधी त्याच कटआऊटला दूधाने आंघोळ घालून आजही कायम आहे. रजनीकांतचा पिक्चर मुंबईत अरोरा ( माटुंग्याचे साऊथच्या पिक्चरचे हुकमी होते. तेही बंद झालयं हो.) अथवा सायन, वडाळ्याच्या मल्टीप्लेक्समध्ये रिलीज होताना पहिल्याच दिवशी भल्या पहाटे ढोल ताशांनी गजर करीत आजही ते कटआऊटला दूधाची आंघोळ घालणे होत असते. पिक्चरमध्ये पब्लिक कसा इन्व्हॉल्व्ह आहे यात दिसते. पिक्चर पाहणे म्हणजे जणू एक जल्लोष. (Poshter Boyz 2)

     हे सांगायला निमित्त ठरलयं ते, श्रेयस तळपदेच्या “बाॅईज २’चे तब्बल पंचवीस फूटी पोस्टर ढोल ताशांच्या गजरात प्लाझा थिएटरवर चढवले. हा एकदम भारी शो होता. श्रेयस तळपदे, अनिकेत विश्वासराव यांनी याच आनंदात ताल धरला आणि रिल तयार झाले समजू शकतो. पण दिलीप प्रभावळकरांनाही उभ्या उभ्या हलावसं वाटलं ही सांगता येत नाही, कदाचित बातमीही होईल. थिएटरवरचं मराठी चित्रपटाच्या लक्षवेधक डेकोरेशनची खूपच मोठी आकर्षक परंपरा आहे. माझ्या आठवणीतील काही थिएटर डेकोरेशन आवर्जून सांगायलाच हवीत. 

    दक्षिण मुंबईतील गिरगावात लहानपणाचा मोठा होताना आमच्या खोताची वाडी ( तसेच आंबेवाडी, पेंडसे वाडी)च्या बरोबर समोर मूकपटाच्या काळापासूनचे मॅजेस्टिक थिएटर होते. एका टोकापासून दुसर्‍या टोकावर असा पिक्चरचे भारी डेकोरेशन करायला फुल्ल स्कोप. कधी त्याच्या मागच्या बाजूलाही पिक्चरमधील एकाद्या दृश्याचा देखावा उभा करीत. सगळा माहौल पाहून आपण हा चित्रपट एकदा पाह्यलाच हवा असा फिल येणारच. माझ्या आठवणीतील मॅजेस्टिक थिएटरवरचे डेकोरेशन अनंत माने दिग्दर्शित ‘अशीच एक रात्र होती’ ( १९७१) या म्युझिकल रहस्यरंजक चित्रपटाचे! जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक अशी त्या काळातील अतिशय लोकप्रिय जोडी. तसेच दादा साळवी, राजशेखर, वत्सला देशमुख, गणपत पाटील, निळू फुले, माया जाधव अशी अगदी तगडी स्टार कास्ट. पिक्चरची थीम आणि थिएटरवरचे डेकोरेशन यांचा मेळ अगदी परफेक्ट जमवला होता. तोच तर महत्वाचा असतो.

  असाच भारी ताळमेळ आठवतोय तो मॅजेस्टिकजवळच्याच सेन्ट्रल थिएटरवरचा चित्रपती व्ही. शांताराम निर्मित व दिग्दर्शित ‘पिंजरा ‘ ( १९७२)च्या थिएटर डेकोरेशनचा. व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपट म्हणजे त्याच्या थीमनुसार टायटल्स अर्थात श्रेयनामावली, पोस्टर, टॅगलाईन आणि थिएटर डेकोरेशन हीदेखील खास वैशिष्ट्य. ‘पिंजरा’मध्ये तमाशाच्या बोर्डावर नाचणारी कोल्हाटीण चंद्रकला ( संध्या) आणि तिच्या जाळ्यात कळत नकळतपणे अडकत गेलेले गावाला आदर्शवाद शिकवणारे, सुसंस्कृत, उच्चवर्णिय शाळामास्तर ( डाॅ. श्रीराम लागू) यांच्यातील नात्याची गोष्ट. आणि त्यात अनेक लहान मोठ्या व्यक्तिरेखांसह आजही लोकप्रिय असलेले गीत संगीत व नृत्य, या सगळ्याचा मेळ थिएटर डेकोरेशनमध्ये बसवणे कसब, कौशल्य, कसोटी होती. त्यात यश प्राप्त झाले आणि वत्सला देशमुख यांच्यापासून निळू फुलेंपर्यंत अनेकांना सेन्ट्रलच्या थिएटर डेकोरेशनमध्ये स्थान मिळाले. अगदी एका बाजूस कशी नशिबाने आज मांडली गाण्यातील मास्तरांचं रुप सहानुभूती मिळवणारे होते. (Poshter Boyz 2)

    आठवणीतील थिएटर डेकोरेशननध्ये दत्तात्रय चित्र बॅनरखालील सीमा देव निर्मित व राजदत्त दिग्दर्शित ‘सर्जा’ ( १९८७) चे प्लाझा थिएटरवरचे डेकोरेशन आवर्जून सांगायलाच हवे. त्याची बरीच चर्चा रंगली. या ऐतिहासिक चित्रपटाच्या अतिशय फोकस्ड पूर्वप्रसिध्दीने चित्रपटाबाबत विलक्षण उत्सुकता वाढलेली. चित्रपटात रमेश देव, सीमा देव, रवींद्र महाजनी, अजिंक्य देव, कुलदीप पवार, निळू फुले, नवतारका पूजा पवार इत्यादींच्या प्रमुख भूमिका.  प्लाझाचा प्रीमियरही अतिशय दणक्यात साजरा झाला. अशा सकारात्मक वातावरणात थिएटरवरचे डेकोरेशनशी तसेच भारी आणि लक्षवेधक हवे ना? अगदी तस्सेच होते. भव्य शिवकालीन तोफच उभारली आणि बाजूलाच सर्जा आणि मावळे असा एकूणच दृश्य प्रकार लक्षवेधक ठरत होता. ही तोफ पाहण्यातही थ्रील होते आणि म्हणूनच हे डेकोरेशन पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आणि तीच गर्दी चित्रपटाचे तिकीट काढू लागली. असे प्रभावी आणि भारावून टाकणारे डेकोरेशन असेल तर पिक्चर पहावासा वाटणारच. मल्टीप्लेक्स युगात हे कल्चर हरवत गेले आणि आता जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स ते कल्चर जगवताहेत. 

   थिएटर डेकोरेशनची परंपरा खूपच जुनी. चित्रपट संस्कृतीतील एक महत्वाचा फंडा. कधी खुद्द एकादा फिल्मवाला आपल्या चित्रपटाच्या मेन थिएटरवर जाई आणि डेकोरेशन कसे हवे/असेल/ असायला हवे याकडे लक्ष देत. याबाबतच्या गोष्टी, किस्से, कथा काही वेगळ्याच… त्या पुन्हा कधी तरी.

                 दिलीप ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Sachin PIlgoankar Fake Name
Read More

सचिनने पहिले दिग्दर्शन चक्क टोपणनावाने का बरे केले?

मनोरंजन क्षेत्रात आपल्या मूळ नावातच बदल करणे (रवि कपूरचा जितेंद्र झाला), कोणी नावात शाॅर्टफाॅर्मने आडनाव अगोदर लावणे (शांताराम…
Ashok Saraf Opposition
Read More

अशोक सराफची अशोक सराफशीच स्पर्धा झाली तेव्हा….

आपल्या एकावन्न वर्षांच्या अष्टपैलू कारकीर्दीत ‘बहुरुपी’ अशोक सराफने कळत नकळतपणे अनेक लहान मोठे विक्रम केलेत आणि हेच त्याचे…
Madhuri Dixit Tim Cook
Read More

Apple चे सीईओ टीम कूक यांना मुंबईच्या वडापावची भुरळ, धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत घेतला वडापावचा आस्वाद..

तुम्ही आम्हीदेखील वडापाव खातोय, त्याचे हुकमी चवीचे ‘हाॅट स्पाॅट ‘ आपल्यालाही सवयीचे झालेत. जिभेला काही गरमागरम खावसं वाटलं…
Mahesh Kothare Sachin Pilgoankar
Read More

कोठारे-पिळगावकर कुटुंबा बाबत अनोखा योगा योग!वडिलांनी चित्रपट सृष्टीत आणलं आणि पाहिल्याचं चित्रपटात मिळवले पुरस्कार

सध्या हुकमी हवा कोणाची आहे? राजकारणातील उलटसुलट हवा म्हणत नाही हो की उन्हाळ्यात अधूनमधून चक्क वीजांचा कडकडाट होत…
Bollywood Actors in Marathi
Read More

हिंदीवाल्यांचे मराठीत पाऊल भारी कौतुकाचे

रोहित शेट्टीचा ‘स्कूल काॅलेज आणि लाईफ’ ( त्याची बायको महाराष्ट्रीय असल्याने त्याने मराठी चित्रपटाची निर्मिती करुन ‘घरची मर्जी…