मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता संभेराव ही तिच्या विनोदी अभिनयासाठी ओळखली जाते. आतापर्यंत अनेक विनोदी मालिका व कार्यक्रम तिने केले असून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे आता ती जगभरात पोहोचली आहे. नम्रता आपल्या उत्तम विनोदासाठी तर ओळखली जाते, शिवाय ती उत्तम गायकही असून याची झलक ऑनस्क्रीन व सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. (namrata sambherao)
नम्रताच्या विनोदाचे अनेक चाहते आहे, शिवाय तिच्या आवाजाचेही चाहते प्रचंड कौतुक करतात. पण नम्रताच्या या सुंदर आवाजाला एका जवळच्या व्यक्तीची साथ लाभली असून त्या व्यक्तीसाठी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
‘त्या’ व्यक्तीसाठी नम्रताची स्पेशल पोस्ट (namrata sambherao special post)
अभिनेत्री नम्रता संभेराव हिच्या मोठ्या बहिणीचा आज वाढदिवस. यानिमित्त नम्रताने तिच्या बहिणीसोबतचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक स्पेशल पोस्ट लिहिली आहे. या फोटोत नम्रता व तिची बहीण दिसत आहे. तर लिहिलेल्या पोस्टमध्ये नम्रता म्हणते, “Happy birthday ताई ???????????? मोठी बहीण ???? माझ्या आयुष्यात मला वाटतं पहिला आदर्श कोण असेल तर मला वाटत माझी ताई ???? दिसायला देखणी, गोरी पान, लांब सडक केस आणि पारदर्शक स्वभाव असलेली माझी ताई उत्तम गाते सुद्धा, मला जे काही थोडं फार गाता येतं ते ताईमुळे. तिचं गाणं ऐकून ऐकुन मला हि गाणं कळलं थोडं फार, तिच्याइतकं नक्कीच नाही ???? सगळ्यांचा विचार करणारी मनमोकळं हसणारी माझी ताई, उत्तम आई, सून, बायको, शिक्षिका तर आहेच पण उत्तम माणूस आहे ???????????? तुझ्याकडून खूप प्रेरणा मिळते ताई मला, आणि माझं आदरयुक्त प्रेम हि खूप आहे तुझ्यावर ???? love you ???? god bless you ????” (namrata sambherao special post)
हे देखील वाचा : ‘ठरलं तर मग’च्या अमितला चाहत्यांनी ओळखलंच नाही, लोकल ट्रेनने प्रवास करताना फोटो शेअर करत म्हणाला, ‘मी त्यांना डुप्लिकेट..’
नम्रताच्या या पोस्टवर चाहत्यांनीही तिच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. नम्रताची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नम्रताच्या पोस्टवरील माहितीनुसार नम्रताची बहीण उत्तम गायिका व शिक्षिका आहे. तर नम्रताचं ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटक रंगभूमीवर सुरु असून लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
