कलाकारांसोबत त्यांची मुलंही चाहत्यांच्या मनात घर करतात. बरीच कलाकार मंडळी आहेत जी त्यांच्या मुलांचे अनेक व्हिडीओ फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करत असतात. चाहतेही या कलाकारांच्या मुलांवर भरभरून प्रेम करतात. दिवस रात्र चित्रीकरणानिमित्त घराबाहेर असणाऱ्या या कलाकार मंडळींना मुलांना वेळ देणं फारसं जमत नाही. तरीदेखील ही कलाकार मंडळी वेळात वेळ काढून मुलांकडे लक्ष देत असतात. पालक म्हणून आपली जबाबदारी ते पार पाडत असतात. हास्यजत्रेतील अशीच एक अभिनेत्री आहे जिचं तिच्या लेकासोबतच बॉण्डिंग नेहमीच प्रेक्षकांना भावुक करत. (Namrata Sambherao On Rudraaj Sambherao)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या कार्यक्रमातील कलाकार मंडळींमुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेरावही तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकत असते. लॉली या भूमिकेसाठी नम्रता चांगलीच चर्चेत असते. नम्रता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरही तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरून नम्रता तिचा मुलगा रुद्राजचे बरेच व्हिडीओ शेअर करत असते. आताही रुद्राजचा एक क्युट व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रुद्राज आई सोबत दिसतोय. हा रुद्राजबरोबरचा व्हिडीओ नम्रताने तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे.
नम्रताने शेअर केलेल्या या व्हिडीओवरून असं कळतंय की नम्रताला तिच्या वाढदिवसानिमित्त रुद्राजने सरप्राईज दिलं आहे. रुद्राजने आईसाठी म्हणजेच नम्रतासाठी त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरात ग्रीटिंग कार्ड देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हॅप्पी बर्थ डे आई’ असं रुद्रजने लिहिलं आहे. चला तर पाहुयात रुद्राजने नम्रताला दिलेल्या शुभेच्छा.
रुद्राजचा हा गोड व्हिडीओ नम्रताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, त्याखाली तिने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “happy Birthday Aai , ह्या दिवसाची वाट पहात होते ???? हे जगातलं सुंदर गिफ्ट आहे जे मला रुद्राज ने दिलं आहे, स्वकष्टाने बाबांच्या मदतीने ???? रुद्राजचं हस्ताक्षर”. रुद्राजने आईसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. रुद्राज व नम्रताचं बॉण्डिंग नेहमीच ती सोशल मीडियावरून शेअर करत असते.