महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने साऱ्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या कार्यक्रमाचे आणि कार्यक्रमातील कलाकारांचे लाखोंमध्ये चाहते दिवाने आहेत. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळी, राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाला या कार्यक्रमाने खुर्चीत खिळवून ठेवण्यास भाग पाडलं आहे. या कार्यक्रमातील एक बहुगुणी कलाकार जो साऱ्या महाराष्ट्राचा लाडका आहे तो म्हणजे अभिनेता ओंकार भोजने. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड करणाऱ्या ओंकारने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केलं. (Onkar Bhojane Namrata Sambherao)
सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षक वर्गाचा लाडका अभिनेता ओंकारने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ब्रेक घेत सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे पाऊल टाकलं आहे. आज ओंकार महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात नसला तरी आजही त्याचे चाहते त्याची हास्यजत्रेत वाट पाहत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव हिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटो मध्ये नम्रता सोबत अभिनेता ओंकार भोजने आणि अभिनेता प्रसाद खांडेकर दिसतोय. नम्रताने या फोटोला नो कॅप्शन निडेड असं कॅप्शन दिल आहे. त्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.
पाहा ओंकारच्या चाहत्याला नम्रता काय म्हणाली (Onkar Bhojane Namrata Sambherao)
नम्रताने शेअर केलेल्या या फोटोवरील एका कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे. ओंकारच्या एका चाहत्याने ही कमेंट केली असून नम्रताने त्याच्या चाहत्याला कमेंट करून उत्तर ही दिल आहे. ओंकारच्या चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे की, तू गद्दार आहेस ओंक्या, तू तुझ्या सर्व फॅन्स सोबत गद्दारी केली आहेस यार, मिस करतो यार आम्ही सगळे तुला, तू का सोडली महाराष्ट्राची हास्यजत्रा, निदान निमिष सारखं कधीतरी यायचं ना स्किट साठी, ये एकदा परत, खूप आनंदी होऊ आम्ही तुला पाहून हास्यजत्रेत. (Onkar Bhojane Namrata Sambherao)
हे देखील वाचा – आणि भर कार्यक्रमात प्रेक्षकांनी दीपाला उचललं तेव्हा
चाहत्याच्या या कमेंटवर नम्रताने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ते तसं नाही आहे, त्याला फक्त नवीन गोष्ट शोधायची होती, नवीन मार्ग, नवीन उपक्रम आणि स्वतःचा शोध घ्यायचा होता. त्यामुळे आपण त्याच्या निर्णयांचा आदर केला पाहिजे आणि त्याला पाठिंबा दिला पाहिजे. (Onkar Bhojane Namrata Sambherao)
आज ओंकार हास्यजत्रेत नाही आहे याच साऱ्यांनाच वाईट वाटतंय. आजही त्याचे चाहते त्याला मिस करत आहेत. त्याचे आधीचे स्किट्स ही वारंवार सोशल मीडियावरून चाहते पोस्ट देखील करत असतात. चाहत्यांसाठी का होईना ओंकार आता हास्यजत्रेत पुन्हा परतणार का हे पाहणं रंजक ठरेल.
