बॉलिवूड विश्वातून रात्री एक एकीकडे चित्रपट निर्माते सुभाष घई यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे, तर दुसरीकडे करण जोहरची आई हिरू जोहर यांची प्रकृती खालावली आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री असलेल्या सायरा बानो यांचीही तब्येत बिघडली असल्याचे वृत्त समोर येत आहे. सायरा बानो सध्या ८० वर्षांच्या आहेत. त्यांच्या पायाच्या मांड्यामध्ये (पायाचा वरचा स्नायुंचा भाग), गाठी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना चालायला त्रास होत होता. यापूर्वी त्यांना न्यूमोनिया झाला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (saira banu health update)
सायरा बानो यांच्या टीमने आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे. त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत आहे. त्याच्या आधीच्या समस्यांमुळे त्यांना खूप त्रास होत होता, पण आता त्या बऱ्या आहेत. सायरा यांच्या पीआरने इंडिया टुडे डिजिटलला सांगितले की, “त्या आता बऱ्या आहेत. गाठी आणि न्यूमोनियाच्या आधी सर्व गोष्टी घडल्या होत्या, परंतु आता त्यांची प्रकृती सुधारली असून त्या ठीक आहेत”.

आणखी वाचा – “माझा नातू माझं स्किट करेल”, अरुण कदम यांचे नातवाविषयी भाष्य, म्हणाले, “मला स्क्रीनवर बघून…”
अभिनेत्री सायरा बानो यांचं फक्त त्यांच्या सौंदर्यामुळेच नाही तर, अभिनयामुळे देखील सर्वच स्तरातून कौतुक झालं. शिवाय स्टाईल आयकॉन म्हणून देखील त्यांची ओळख होती. पण १९७० साली खासगी आयुष्याचं कारण सांगत त्यांनी बॉलिवूडचा निरोप घेतला. पण त्यांनी कायम चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता त्यांची प्रकृतीबद्दलच्या अनेक बातम्या येत असतात.
आज सायरा बानो यांना कोणत्या ओळखीची गरज नाही. सायरा बानो यांनी वयाच्या १७ व्या वर्षी १९६१ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंगली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटात त्यांनी अभिनेते शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. त्या दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आहेत.