‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर घराघरांत पोहोचला. या मालिकेतील श्री या भूमिकेमुळे शशांकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मलिकविश्वात महत्त्वपूर्ण कामगिरी करत शशांकने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. याशिवाय त्याने अनेक चित्रपट, वेबसीरिजमध्येही काम केले आहे. असा हा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याच्या या मालिकेतील भूमिकेलाही प्रेक्षकांना अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. (shashank ketkar)
अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांची नेहमी संवाद साधत असतो. अनेक व्हिडीओ तसेच फोटो तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. याशिवाय शशांक नेहमीच स्पष्टपणे भाष्य करण्यामुळेही चर्चेत असतो. अनेकदा शशांक समाजातील न पटणाऱ्या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. तसेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. शशांक २०१७ साली प्रियंका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला.
बायकोबरोबर फिरताना, वेळ घालवतानाच्या अनेक पोस्ट तो वेळोवेळी त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. अशातच प्रियांकाने नवऱ्याची एक स्टोरी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये शशांकने स्वतःच्या हाताने प्रियांकासाठी व्हेज बिर्याणीचा बेत केलेला पाहायला मिळत आहे. प्रियांकाने बिर्याणीबरोबर शशांकचा फोटो पोस्ट करत “व्हेज बिर्याणी शेफ बाय शशांक केतकर”, असं म्हटलं आहे.
प्रियांकाची ही पोस्ट पाहून शशांक चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत पत्नीला वेळ देताना दिसत आहे. बायकोचे लाड पुरवत तो कुटुंबाला वेळ देत असल्याचं समोर आलं आहे. शशांक आणि प्रियांका यांचं खास बॉण्डिंग नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. शशांक व त्याची पत्नी प्रियांका यांची भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. यावेळी झालेल्या ओळखीचं रूपांतर कालांतराने मैत्रीत झालं आणि दोघांनी ४ डिसेंबर २०१७ साली लगीनगाठ बांधली. पेशाने वकील असलेली प्रियांका उत्तम नृत्यांगना देखील आहे.