मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐश्वर्या नारकर यांचे आई-बाबाच बघत नाहीत ‘सातव्या मुलीची…’ मालिका, स्वत:च म्हणाल्या, “आक्रमक, विकृत…”    

Saurabh Moreby Saurabh More
जून 22, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Narkar's parents don't watch Satvya Mulichi Satavi Mulgi serial actress says the reason.

ऐश्वर्या नारकर यांचे आई-बाबाच बघत नाहीत ‘सातव्या मुलीची...’ मालिका, स्वत:च म्हणाल्या, “आक्रमक, विकृत...”

एखाद्या कथेत नायक व नायिका जितकी महत्त्वाची असते. तितकाच किंबहूना त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो तो म्हणजे खलनायक. खलनायकाशिवाय एखाद्या कलाकृतीची कल्पना करणंही हे अवघडच असतं. अशीच खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या रुपाली ही खलनायकाची भूमिका साकारत आहे.  या मालिकेत ऐश्वर्या यांची रुपाली व विरोचकाची अत्यंत विकृत भूमिका दाखवण्यात आली आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत विरोचक शत्रुंचा वध करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र हेच काही प्रेक्षकांना आवडत नाही. प्रेक्षकांसह ऐश्वर्या यांच्या आईलाही रुपालीची ही भूमिका आवडत नसल्याचे ऐश्वर्या यांनी सांगितले आहे. ऐश्वर्या यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील “रुपाली ही भूमिका त्यांच्या आईला आवडते का?, रुपाली या भूमिकेबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात?” असा प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मधील सायलीकडे खऱ्या आयुष्यात आहे पिस्तूल, अभिनेत्रीला जीवे मारण्याची दिलेली धमकी, म्हणाली, “माझ्याबरोबर सहा महिने…”

या प्रश्नाचे उत्तर देत ऐश्वर्या यांनी असं म्हटलं की, “मालिकेत मी कुणाला मारत असेल तर किंवा मला कुणी मारत असेल तर आई टीव्ही बंद करते. त्यामुळे आई-बाबा ही मालिका बघत नाहीत. या मालिकेत माझी भूमिका ही खूपच आक्रमक व विकृत दाखवली आहे. त्यामुळे ती ही मालिका बघत नाही. तसेच ही मालिका रात्री साडे दहा वाजता लागत असल्याने आई-बाबा जागे राहत नाहीत”.   

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’च्या अर्जुनने सांगितली त्याच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी, बायकोला I Love You ही म्हटला नाही अन्…; म्हणाला, “माझी पत्नी…”

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत त्यांनी अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरेची आई रुपाली म्हात्रेची (विरोचक) भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता या भूमिकेद्वारे त्यांना ओळखलं जात आहे.

Tags: aishwarya narkarmarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Paaru Serial Update

आदित्यबरोबरच्या लग्नाचं सत्य सावित्रीला कळालं, तर अहिल्यादेवी पारूवर नाराज, माफी मागताच निघूनही गेल्या अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.