गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ज्या शाळेत मतदान केले…”, मतदानानंतर शशांक केतकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, “कोणत्याही पार्टीतील निवडून आलं तरी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 15, 2026 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shashank Ketkar video

"ज्या शाळेत मतदान केले...", मतदानानंतर शशांक केतकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, "कोणत्याही पार्टीतील निवडून आलं तरी..."

Shashank Ketkar video : राज्यातील २९ महानगरपालिकांसह मुंबई महानगरपालिकेसाठीही मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांचा प्रचार सुरु असलेला पाहायला मिळाला. आता पक्षांच्या जोरदार प्रचारानंतर मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांप्रमाणे अनेक मराठी कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. या यादीत हेमंत ढोमे, क्षिती जोग, ऐश्वर्या नारकर असे अनेक कलाकार आहेत. तर अभिनेता शशांक केतकरनेही मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

शशांक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. रस्ते, ट्राफिक यांसारख्या सामाजिक विषयांवर तो नेहमीच आवाज उठवताना दिसतो. अशातच आता शशांकने केलेल्या आणखी एका पोस्टने लक्ष वेधलं आहे. मतदानाच्या दिवशीच ज्या शाळेत मतदान करायला गेला त्या बाहेर असलेल्या रस्त्यावरील कचऱ्याचा एक व्हिडीओ त्याने पोस्ट करत सत्य परिस्थिती दाखवली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 6 : दीपाली-तन्वीमध्ये जोरदार भांडण, एकमेकांची उणीधुणी काढली अन्…; वाद पेटणार

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शशांकने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन देत म्हटलं की, “ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या अगदी बाहेर ही अवस्था आहे. उद्या कोणत्याही पार्टीतील कोणीही निवडून आलं तरी ‘स्वच्छता’ या बेसिक गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही आणि नागरीकसुद्धा स्वच्छतेकडे लक्ष देणार नाहीत याची खात्री आहे. ही माझ्या मनातील उदासीनता, negativity नाही. वस्तुस्थिती आहे. INTERNATIONAL SCHOOL आहे ही ठाण्यातील. त्या शाळेच्या दारात ही अवस्था आहे”.

आणखी वाचा – नॉमिनेशनमध्ये ‘पॉवर की’चा खेळ, पहिल्याच आठवड्यात ‘हे’ ९ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट, ‘त्या’ ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा

“एक असा अभिनेता जो निर्भीडपणे कोणालाही न घाबरता बिनधास्त सत्य लोकांनं समोर मांडतो”, “मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी कलाकर आहेत की जे अशाप्रकारे आवाज उठवतात. शशांक दादा खूप खूप धन्यवाद”, “अरे वाह ठाणेकर. मतदानाचा हक्क बजावला आणि प्रशासन, नागरिक यांचे कानही टोचले. जागरूक नागरिक शशांक केतकर”, अशा कमेंट प्रेक्षकांनी करत त्यांच कौतुक केलं आहे.

Tags: electionmarathi actorshashank ketkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
ankita walawalkar first makar sankrant

हलव्याचे दागिने, पारंपरिक कपडे अन्…; अंकिता वालावलकरची पहिली संक्रांत, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "३५० बायकांसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.