रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एकीकडे वडील गेले, अंत्यसंस्काराला जाताना लेकीनेही गमावला जीव, कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 19, 2025 | 3:51 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Mumbai goa highway car accident

एकीकडे वडील गेले, अंत्यसंस्काराला जाताना लेकीनेही गमावला जीव, कुटुंबातीच पाच जणांचा मृत्यू अन्...

रस्ते अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ड्रायव्हरला डुलकी लागली, अती वेग, गाडीवर ताबा सुटणं अशा कित्येक कारणांमुळे रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. आता अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन किया कार थेट १०० ते १५० फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात दोन कुटुंबातील एकूण पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातामध्ये लेकीला तिच्या वडिलांना शेवटचंही पाहता आलं नाही. नक्की काय घडलं?, अपघात कसा झाला? याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे. (Mumbai goa highway car accident)

सोमवरी पहाटे जवळपास पाच वाजता हा अपघात घडला असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं. नालासोपारा भागातील पराडकर कुटुंब आणि मीरा-भाईंदर परिसरातील मोरे कुटुंब देवरुख येथील गावी जात होते. दोन्ही कुटुंबिय रविवारी रात्री गावी जाण्यास घराबाहेर पडले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर दोन्ही कुटुंबियांवर काळ धावून आला. अपघाताची भीषणताही भयावह होती.

आणखी वाचा – केदारनाथमध्ये एक पाण्याची बॉटल १०० रुपयांना का?, ‘त्या’ कामगाराचं बोलणं ऐकून कळेल सत्य परिस्थिती, फक्त पैशांसाठी…

जगबुडी नदीच्या पुलावर कार असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला. दरम्यान कार थेट नदीतच बुडाली. या जीवघेण्या अपघातात मिताली विवेक मोरे (४५), निहार विवेक मोरे (१९), श्रेयस राजेंद्र सावंत (२३), मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (२२) यांचा मृत्यू झाला. मिताली मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी दोन्ही कुटुंबिय गावी जात होते. मात्र वडिलांना शेवटचं पाहण्यापूर्वीच मितालीनेही जगाचा निरोप घेतला. दोन्ही कुटुंबातील पाच माणसं एकत्र मरण पावणं हेही अतिशय वेदनादायी ठरलं.

आणखी वाचा – ११ वर्षांचा लेक गेला, रागाने देवांच्या मुर्ती फेकल्या अन्…; शेखर सुमन यांचा वाईट काळ, म्हणाले, “देवानेच मुलाला नेलं आणि…”

पहाटे अपघात झाल्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच तेथील नागरिकांनीही अपघातस्थळी बचावकार्य करण्यास प्रयत्न केले. नदीत कोसळलेल्या कारला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. कारमधील प्रवाशांनाही बाहेर आणलं. जवळपास असलेल्या रुग्णालयात जखमींना नेण्यात आलं. परमेश पराडकर व विवेक मोरे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Tags: trending newstrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Odisha Women Murdered

रस्त्यावर सोडलेल्या मुलीला दत्तक घेतलं, शेवटी तिनेच आईला संपवलं, बॉयफ्रेंडच्या मदतीने केलं असं काही की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.