मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रिक्षाने प्रवास करताना मुक्ता बर्वेची झाली हालत, नीट बसताही येईना, म्हणाली, “खड्ड्यातून वाट काढत जाणारा रस्ता…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
mukta barve share video from rikshaw suffer from road issue in Mumbai see details

Video : रिक्षाने प्रवास करताना मुक्ता बर्वेची झाली हालत, नीट बसताही येईना, म्हणाली, “खड्ड्यातून वाट काढत जाणारा रस्ता...”

सार्वजनिक तसेच खासगी वाहनांनी प्रवास करताना बऱ्याचदा सर्वसामान्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागतो. शिवाय महाराष्ट्रातील काही भागातील रस्त्यांची परिस्थिती पाहता प्रवास करताना बऱ्याच अडचणी येतात. खड्ड्यांमुळे तर मुंबई सारख्या शहरांत रस्त्याची चाळण झाली आहे. याचा फक्त सर्वसामान्यांनाच नव्हे तर कलाकार मंडळींनाही त्रास होतो. याबाबत काही स्थरातील लोक बोलताना दिसतात. तसेच कलाकारही व्यक्त होतात. आता असंच काहीसं घडलं आहे. कामानिमित्त रिक्षाने प्रवास करताना अभिनेत्री मुक्ता बर्वेला एक वेगळाच अनुभव आला. याचबाबत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Mukta Barve On Instagram)

कलाकार ट्राफिक विषयी असो किंवा रस्त्यांची झालेली दुर्दशा याबाबत खुलेपणाने बोलताना दिसतात. पण अनेकदा अशाप्रकारच्या मुद्द्यांवर बोलूनही परिस्थिती जैसे थे असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुक्ताने पुन्हा एकदा रस्त्यांची झालेली चाळण प्रशासनाच्या नजरेस आणून दिली आहे. रिक्षाने प्रवास करताना मुक्ताला त्रास सहन करावा लागला. तिच्या त्रासामागचं कारण म्हणजे रस्त्यांवरील खड्डे. खड्ड्यांमुळे रिक्षामध्ये नीट मुक्ताला बसताही येत नव्हतं. म्हणूनच तिने एक व्हिडीओ शूट करत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

आणखी वाचा – “पुणे तिथे काय उणे इथे…”, भर थिएटरमध्ये माधुरी दीक्षितचा नवऱ्यासाठी खास उखाणा, नेनेंनीही घेतलं नाव

या व्हिडीओमध्ये मुक्ता सतत हलताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करताना तिने म्हटलं की, “आता आपण शिकुया बसल्याजागी करायचा नाच. यासाठी लागणारं साहित्य रिक्षा, खड्डे आणि खड्ड्यातून वाट काढत जाणारा रस्ता.” मुक्ताने अगदी मजेशीर अंदाजात गंभीर समस्या मांडली आहे. मुक्ताने चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला दिसत आहे. याआधीहीने तिने काही सामाजिक विषयांवर अगदी खुलेपणाने भाष्य केलं होतं.

आणखी वाचा – “माईकवरून भसाड्या आवाजात…”, घराशेजारी कित्येक दिवस जत्रा भरल्याने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला त्रास, म्हणाली, “का सहन करायचं?”

मुक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. आपल्याला चंद्रावर जाण्याची गरज नाही, मुक्ताने नुकताच केलेला नाच अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर सुकन्या मोनेंनीही हसण्याची इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. शिवाय काही मिनिटांमध्येच मुग्धाच्या या व्हिडीओवर अधिकाधिक लाइक व कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

"लग्नानंतरची पहिली मैफिल", मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे या नववधूवराची कामाला सुरुवात, फोटो पोस्ट करत म्हणाले, "एकत्र…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.