Mukesh Khanna Reaction On Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाने काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांच्यावर जोरदार प्रहार केला. कारण पालनपोषणावर प्रश्न उपस्थित करताना अभिनेत्याने २०१९ मध्ये केबीसीमध्ये ‘रामायण’शी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर सोनाक्षी देऊ शकली नाही ही अभिनेत्रीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची चूक असल्याचे म्हटले होते. यावर अभिनेत्रीने एक लांब नोट शेअर करुन मुकेश खन्ना यांना प्रेमाने प्रतिसाद देत चोख उत्तर दिलं. “मी नुकतेच तुमचे एक विधान वाचले आहे ज्यात असे म्हटले आहे की अनेक वर्षांपूर्वी एका शोमध्ये रामायणाबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर न देणे ही माझ्या वडिलांची चूक आहे”, असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली. आता पुन्हा ‘शक्तीमान’ने यावर प्रतिक्रिया दिली असून आपला कोणताही चुकीचा हेतू नसल्याचे म्हटले आहे.
‘न्यूज ९’शी संवाद साधताना मुकेश खन्ना सोनाक्षी सिन्हाच्या प्रतिक्रियेवर म्हणाले, “मला आश्चर्य वाटते की सोनाक्षीला प्रतिक्रिया देण्यासाठी इतका वेळ लागला. केबीसी शोमध्ये घडलेल्या त्या घटनेसाठी मी त्याचे नाव घेऊन नाराज होतो हे मला माहीत होते. पण तिची किंवा त्यांच्या वडिलांची, जे माझे ज्येष्ठ आहेत, त्यांची बदनामी करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझे त्याच्याशी चांगले संबंध आहेत”.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींसमोर येणार पारू-आदित्यच्या लग्नाचं सत्य?, दामिनीचा डाव साध्य होणार का?
मुकेश खन्ना म्हणाले, “गुगल आणि मोबाईलचे गुलाम बनलेल्या आजच्या पिढीबद्दल मी माझे मत व्यक्त करु इच्छितो, ज्यांना त्यांचे वडील ‘जेन्झ’ म्हणतात. त्याचे विकिपीडिया आणि यूट्यूबचे ज्ञान सार्वजनिक बोलण्यापुरते मर्यादित आहे. आणि इथे माझ्यासमोर तुझ्या (सोनाक्षी) एक हायफाय केस आहे ज्याचा उपयोग मी इतरांना शिकवण्यासाठी करु शकतो”.
आणखी वाचा – मोठा धक्का! ‘लापता लेडीज’ ऑस्कर २०२५ मधून बाहेर, भारतातील एकही चित्रपटाचा समावेश नाही
२०१९ मध्ये सोनाक्षी सिन्हाने ‘कौन बनेगा करोडपती ११’ (KBC) मध्ये भाग घेतला होता. यादरम्यान तिला ‘रामायणात हनुमानाने संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती’, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र ती योग्य उत्तर देऊ शकली नाही. सिद्धार्थ कन्ननला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेशने सोनाक्षीला रामायण न शिकविल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर आरोप केले होते. यानंतर सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर मुकेश खन्ना यांच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शत्रुघ्न सिन्हा यांनीही सडेतोड उत्तर दिले.