हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जेव्हा-जेव्हा अभिनेत्रीच्या तब्येतीचे अपडेट समोर येतात तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसतो आणि हिनाची अवस्था पाहून सगळेच काळजीत पडतात. नुकतेच हॉस्पिटलमधून हिनाचा एक फोटो समोर आला होता ज्यामध्ये ती कॉरिडॉरमध्ये फिरत होती आणि तिच्या एका हातात पिशवी आणि दुसऱ्या हातात रक्ताची पिशवी दिसली होती. हिना खानला या असहाय अवस्थेत पाहून चाहते देखील नाराज झाले होते. अशातच आता हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर हिना खान रेस्टॉरंटमध्ये पोहोचली आहे. (Hina Khan Restaurant photo)
हिना खानने रेस्टॉरंटमधील काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती पदार्थांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. तर तिने काही फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्या फोटोमध्ये ती एकटीच दिसत आहे, त्यामुळे साहजिकच हिना खान एकटीच या सगळ्याचा आनंद घेत आहे. स्वतःसोबत हे क्षण एन्जॉय करण्यात व्यस्त आहे. हे खास फोटो शेअर करत हिना खानने सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींसमोर येणार पारू-आदित्यच्या लग्नाचं सत्य?, दामिनीचा डाव साध्य होणार का?
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “हिनाने हे फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले, ‘हे मिरर सेल्फी, चांगले अन्न, चांगले वातावरण, चांगले कपडे आणि शेवटी माझ्या हृदयाच्या आकाराचे थेंब पहायला विसरू नका”. तसंच हे करुन मला खूप छान आणि सुंदर वाटल्याची भावनादेखील हिना खानने या फोटोद्वारे व्यक्त केली आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनीदेखील लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी तिचे कौतुकही केलं आहे. त्याचबरोबर तिने लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थनाही केली आहे.
आणखी वाचा – मोठा धक्का! ‘लापता लेडीज’ ऑस्कर २०२५ मधून बाहेर, भारतातील एकही चित्रपटाचा समावेश नाही
दरम्यान, अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाविरुद्ध लढत आहे. हिनावर उपचार सुरू झाल्यापासून, ती तिच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत आली आहे. तसंच ती तिच्या आयुष्यातील काही खास क्षणदेखील आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.