शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लेकाचं बोलणं ऐकून भर कार्यक्रमातच रडू लागले मुकेश अंबानी, अनंतचेही डोळे पाणावले, आई स्टेजवर आली अन्…; Inside Video व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 2, 2024 | 5:45 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Mukesh ambani cry during anant emotional speech at pre wedding event video viral

Video : लेकाचं बोलणं ऐकून भर कार्यक्रमातच रडू लागले मुकेश अंबानी, अनंतचेही डोळे पाणावले, आई स्टेजवर आली अन्...; Inside Video व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनची. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या काही दिवस आधी जामनगरध्ये प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन केले गेले आहे. १ ते ३ मार्चपर्यंत या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी रडताना दिसत आहेत. लेक अनंत अंबानी यांचे भाषण ऐकून वडील मुकेश अंबानी खूपच भावुक झाले व तत्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहायला लागले.

यावेळी अनंत अंबानीने असं म्हटलं की, “माझ्या आईने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माझ्या लग्नाच्या या प्री-वेडिंग फंक्शनसाठी ती गेल्या चार महिन्यांपासून १८-१९ तास काम करत आहे. माझ्या आईचा मी आभारी आहे जिने हे सर्व केले. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना ईथे आल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देतो. तुम्ही सगळे जामनगरला आला आहात. पण यादरम्यान तुम्हाला काही अडचण आली असेल तर क्षमा करावी.”

View this post on Instagram

A post shared by Viral Entalks (@viralentalks)

आणखी वाचा – “माझ्या आईला जाऊन…”, मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “शरीराने ती आमच्यात नाही पण…”

यापुढे आपल्या आई-वडिलांविषयी भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “माझ्या आरोग्याविषयी अनेक अडचणी असूनही, माझ्या आई-वडिलांनी मला कधीही वेगळे वाटू दिले नाही. ते सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला त्यांनी कायमच धीर दिला. वेळोवेळी माझे मनोबल वाढवले. तसेच मी स्वतःला भाग्यवान समजतो की, माझ्या आयुष्याची साथीदार म्हणून मला राधिकासारखी मुलगी मिळाली.” लेकाचे हे शब्द ऐकताच मुकेश अंबानींणा अश्रू अनावर झाले आणि ते रडू लागले.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या नावाने पैशांची मागणी, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत सांगितली घटना, म्हणाला, “हा गैरप्रकार…”

दरम्यान, मुकेश अंबानींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पैसाच सर्व काही नसतं. खूप पैसे असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातही अनेक समस्या असतात हे आज कळलं, माणूस कितीही श्रीमंत असला तरी प्रत्येक बाप आपल्या लेकाविषयी भावुक होतोच अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त  केल्या आहेत.         



Tags: Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in MarathiAnant Ambani Radhika Merchant Pre Wedding PhotosAnant Ambani Radhika Merchant Pre Wedding VideosAnant Ambani Radhika Merchant’s pre wedding bashAnant Ambani Radhika Merchant’s pre wedding Marathi NewsAnant Ambani Wedding News in MarathiAnant Ambani-Radhika Merchant’s pre wedding Jamnagarmukesh ambaninita ambaniradhika merchantअनंत अंबानी राधिका मर्चंट प्री वेडिंग जामनगरअनंत अंबानी राधिका मर्चंट प्री वेडिंग सेलिब्रेशन अपडेट्सअनंत अंबानी राधिका मर्चंट प्री वेडिंग सोहळाअनंत अंबानी राधिका मर्चंट मॅरेजअनंत अंबानी राधिका मर्चंट लग्नअनंत अंबानी राधिका मर्चंट लेटेस्ट अपडेट
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Bigg Boss 18 gets its first ever contestant know who is see the details

Bigg Boss 18 Update : ‘बिग बॉस १८’ला मिळाला पहिला वहिला स्पर्धक, घरात जाणार ‘ही’ लोकप्रिय व्यक्ती, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.