रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : स्वतः गाडी चालवत माहेरी पोहोचली मुग्धा वैशंपायन, घरी जेवताना आली नवऱ्याची आठवण, म्हणाली, “तुझी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 6, 2024 | 6:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
mugdha vaishampayan story

Video : स्वतः गाडी चालवत माहेरी पोहोचली मुग्धा वैशंपायन, घरी जेवताना आली नवऱ्याची आठवण, म्हणाली, "तुझी..."

‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या रिऍलिटी शोमधून मुग्धा वैशंपायन घराघरांत पोहोचली. मुग्धाने तिच्या सुमधुर स्वरांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यानंतर अभिनेत्री चर्चेत आली ती म्हणजे तिच्या लग्नामुळे. मुग्धाने तिच्या सोशल मीडियावरुन ‘आमचं ठरलं’ म्हणत चाहत्यांसह तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली. मुग्धाने गायक प्रथमेश लघाटेबरोबरच्या नात्याचा खुलासा केला. त्यानंतर २१ डिसेंबरला ही जोडी अखेर लग्नबंधनात अडकली. (Mugdha Vaishampayan Story)

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी चिपळूण येथे थाटामाटात लग्न केलं. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश दोघांचाही सुखाचा संसार सुरु असलेला पाहायला मिळत आहे. दोघंही त्यांच्या संसारात रमलेले पाहायला मिळत आहेत. इतकंच नव्हे तर, मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या कामालाही सुरुवात केली आहे. दोघंही गायनाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – Video : भर कार्यक्रमात बायकोने ‘अहो’ म्हणताच रितेश देशमुखने मारल्या शिट्ट्या, देशमुखांच्या सूनेचं मराठी ऐकून कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धा सध्या अलिबागच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहे. हा प्रवासादरम्यानचा व्हिडीओ शेअर करत, मुग्धाने “बऱ्याच दिवसांनंतर मी माझी बेबी एलिफंट(गाडी) चालवत आहे”. याखाली तळटीप देत तिने असं लिहिलं आहे की, “हा व्हिडीओ मी गाडी चालवताना शूट केला नाही, त्यामुळे काळजी नसावी”.

आणखी वाचा – “आमच्याबरोबर एकत्र राहिल्याच नाहीत अन्…”, अखेर सासूबाईंच्या वागणूकीवर बोलली अंकिता लोखंडे, म्हणाली, “तोंडावर बोलायचं…”

याचबरोबर मुग्धाने जेवणाच्या थाळीचा एक फोटोही शेअर केला आहे. यांत अगदी पंचपक्वान्न पाहायला मिळत आहेत. हा जेवणाचा फोटो शेअर करत मुग्धाने प्रथमेशला मिस करत असल्याचंही म्हटलं आहे. एकूणच मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओवरुन ती बरेच दिवसांनी ड्रायव्हिंग करत असल्याचं समोर आलं आहे. मुग्धा सोशल मीडियावरुन असे अनेक दैनंदिन जीवनातील अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

Tags: entertainmentmugdha vaishampayanmugdha vaishampayan and prathamesh laghatemugdha vaishampayan instagramMugdha Vaishampayan Story
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ravindra Mahajani Wife Shares Incident

जुगारासाठी सहा सोन्याच्या बांगड्या विकल्या अन्…; गश्मीरच्या आईचा रविंद्र महाजनींबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, "दोनदा घरातून हाकलून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.