मराठी संगीत विश्वातील लाडकी व लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले मुग्धा व प्रथमेश आयुष्यभराचे जीवनसाथी झाले आहेत. प्रथमेश व मुग्धा यांनी लग्नाच्या काही दिवसांपूर्वी ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत लग्न करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर गेल्यावर्षी २१ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले. दोघांचं मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीने लग्न झालं. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाच्या फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. (Mugdha Vaishampayan Ganeshotsav Special Video)
अत्यंत साधेपणाने मुग्धा व प्रथमेश यांचा विवाहसोहळा पार पडला असल्याचं दिसतंय. चिपळूण येथे दोघांनी डेस्टिनेशन वेडिंगचा घाट घातला होता. कारण कोकणात प्रथमेशच घर आहे. प्रथमेश हा मूळचा कोकणातील आहे. त्यामुळे यंदाच्या लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सव सणाला मुग्धा-प्रथमेशने कोकण गाठलं आहे. मुग्धाची सासरवाडी कोकणात आरवली येथे असून सासरच्या गणपती बाप्पाची झलक काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिने शेअर केली होती.
आता मुग्धाने गणेशोत्सवादरम्यानचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मुग्धा उकडीचे मोदक बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुग्धाचा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव ती अगदी आनंदात साजरी करताना दिसत आहे. मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती उकडीचे मोदक बनवताना दिसत आहे. यावेळी गावची परंपरा जपत अगदी मराठमोळ्या अंदाजात मुग्धा मनोभावे मोदक बनवताना दिसत आहे. मुग्धाचा हा साधेपणा अनेकांना भावला आहे.
आणखी वाचा – लेकीचा सांभाळ करायला नॅनी नाही; दीपिका पदुकोण अशी करणार मुलीची देखभाल, ‘या’ अभिनेत्रीला फॉलो करतेय
मुग्धाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह कलाकारांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात प्रथमेश लघाटेला सगळे ‘मोदक’ म्हणायचे. त्यामुळे मुग्धाला मोदक बनवताना पाहून गायिका वैशाली सामंतने या व्हिडीओवर “बनव गं बनव… माझ्या मोदकासाठी मोदक बनव” अशी कमेंट केली आहे. तर, अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या व्हिडीओवर कमेंट करत “मस्त मस्त” असं म्हटलं आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांनीही मुग्धाच कौतुक केलं आहे.