सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत असताना आणखी एक जोडपे लग्नबंधनात अडकलं आहे. ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्समधील गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचे नुकतंच लग्न झाले आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेले काही दिवस मुग्धा सतत आपल्या ताईच्या म्हणजेच मृदुल वैशंपायनच्या लग्नाच्या तयारीबद्दल पोस्ट शेअर करत होती. शिवाय ती ताईच्या हळदीचे, मेहंदीचे, ग्रहमख, लग्नाचे फोटोही शेअर करत होती.(Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding)
मुग्धाच्या ताईच्या लग्नानंतर आता मुग्धा बोहोल्यावर चढणार असल्याची कुणकुण लागली आहे. मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी सोशल मीडियावरून दोघांचा एकत्र फोटो शेअर करत आमचं ठरलं असं म्हणत गुडन्यूज दिली होती. तेव्हापासून मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांच्या केळवणाचेही बरेच फोटो समोर आले.
अशातच मुग्धाच्या स्टोरीवरील फोटोंनी त्यांच्या लग्नाची तारीख जवळ आली असल्याचं समोर आलं आहे. मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या पार्टीच्या फोटोंनी त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. लग्न होण्याआधी ‘ब्राइड टू बी’ पार्टी करतात. अशाच प्रकारे मुग्धाची देखील ‘ब्राइड टू बी’ पार्टी तिच्या मित्र मंडळींनी पार पाडली. याच पार्टीवरून लवकरच मुग्धा देखील लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

मोठ्या बहिणीचे लग्न पार पडल्यानंतर आता सर्वांचे डोळे मुग्धा व प्रथमेश लघाटे यांच्या लग्नाकडे लागून राहिले आहेत. बहिणीच्या लग्नाला मुग्धाचा सहज साधा लूक साऱ्यांना विशेष भावला. तर मेहुणीच्या लग्नाला प्रथमेश लघाटेचीही हजेरी होती. दरम्यान मुग्धाच्या बहिणीच्या लग्नातील साधेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.