काही दिवसांपूर्वीच गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे विवाहबंधनात अडकले. मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाची धामधूम सोशल मीडियावरुन चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळाली. पारंपरिक अंदाजात या जोडीने त्यांचा विवाहसोहळा उरकला. शिवाय त्यांच्या लग्नातील साधेपणानेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली. कोकणातील चिपळूण येथे त्यांचा शाही विवाह पार पडला. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण दोघेही सोशल मीडियावरुन शेअर करत आहेत. अशातच मुग्धाच्या मोठ्या बहिणीने म्हणजेच मृदुल वैशंपायनने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुगाच्या बहिणीने प्रथमेशचा कान पिळतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “आम्ही सुटलो, आता तुझी वेळ आहे प्रथमेश. स्वतः ला सांभाळ. कान २ कारणांसाठी पिळला आहे. १. यासाठी की तुला काय काय सहन करायच आहे याचा अंदाज यावा. २. आमच्या बहिणीला आजिबात त्रास द्यायचा नाही, कळलं?” असं गमतीशीर कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
मुग्धाच्या लग्नाच्या काही दिवस आधीच तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. मृदुलच्या लग्नातील साधेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं व त्यांचं कौतुकही केलं. त्यानंतर मुग्धा व प्रथमेश यांच्या शाही विवाहसोहळा ही थाटामाटात संपन्न झाला. दोघांच्या लग्नाबरोबरच लग्नापुर्वीच्या विधींचेही फोटो चांगलेच व्हायरल झाले. घरच्या घरीच व साधेपणाने त्यांच्या लग्नापूर्वीचे विधी आटोपण्यात आले. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नातील लूकचही सार्यांनी कौतुक केलं.

‘आमचं ठरलं’ म्हणत मुग्धा व प्रथमेशने सोशल मीडियावरुन चाहत्यांसह त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर ही जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. त्यानंतर अखेर ही जोडी २१ डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाली. प्रथमेश-मुग्धाच्या लग्नसोहळ्यातील रिसेप्शन लूकवर तसेच त्यांच्या साखरपुडा समारंभातील फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.