शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हिरवी साडी तर नवऱ्याने नेसलं गुलाबी रंगाचं धोतर; लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्यासाठी मुग्धा-प्रथमेशची जय्यत तयारी, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 9, 2024 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate shared traditional photos on the occasion of GudiPadwa and wished to all

हिरवी साडी तर नवऱ्याने नेसलं गुलाबी रंगाचं धोतर; लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्यासाठी मुग्धा-प्रथमेशची जय्यत तयारी, फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय गायक-गायिकेची जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. आपल्या सुमधुर गायनाने या दोघांनीही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धा व प्रथमेश या दोघांनाही लोकप्रियता मिळाली. मुग्धा व प्रथमेश यांनी एकमेकांसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी अनेक कारणांनी चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

अशातच त्यांनी शेअर केलेला एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आज गुढीपाडवा. हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. आजच्या या खास दिवसानिमित्त राज्यभरात सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. नऊवारी साड्या, दागिन्यांचा साज, धोती, कुर्ते, शाल, फेटे असे पारंपरिक कपडे परिधान करत सर्वजण आज गुढीपाडवा साजरा करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

अशातच आजच्या या गुढीपाडव्याचे खास औचित्य साधत मुग्धा-प्रथमेश यांनीही खास फोटो शेअर करत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपरिक अंदाजातले हटके फोटो शेअर करत “तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप शुभेच्छा” असं म्हणत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षानिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये दोघेही छान दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ठरलेलं लग्न मोडलं, थेट घरी जाऊन लग्नाची मागणी घातली अन्…; अमीर हडकर यांची फिल्मीस्टाइल लव्हस्टोरी, म्हणाले, “तिने आधी नाही म्हटलं तेव्हा…”

मुग्धा-प्रथमेशने शेअर केलेल्या या फोटोमध्ये हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर लाल रंगाचा शेला परिधान केला आहे. तर प्रथमेशने गुलाबी रंगाचा धोतर व त्यावर गुलाबी रंगाचेच उपर्ण घेतले आहे. या लूकमध्ये दोघेही खूपच छान दिसत असून दोघांचा हा फोटो त्यांच्या अनेक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – Video : कुटुंबासह घरी आला, सरप्राइज दिलं अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सुप्रिया पाठारेंचा वाढदिवस केला खास, अभिनेत्रीही भारावली, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, मुग्धा-प्रथमेश यांचा हा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी यंदाचा हा गुढीपाडवा अगदी खास आहे. तसेच त्यांनी शेअर केलेल्या या फोटोखाली अनेकांनी त्यांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्यांच्या या खास पारंपरिक लूकचे कौतुकही केले आहे.      

Tags: marathi entertainment newsmugdha vaishampayanprathamesh laghate
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
avinash narkar and aishwarya narkar reel

Video : नारकर कपलने जोरदार डान्सने केली गुढीपाडव्याची सुरुवात, अविनाश नारकरांची बायकोला उत्तम साथ, नेटकरी म्हणाले, "तरुण जोडपं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.