मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर ही चिरतरुण जोडी आहे. सुरवातीपासूनच या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघंही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. या जोडीने केलेले इन्स्टाग्राम रील्समुळे ते सतत चर्चेत असतात. नेहमी ट्रेंडिंग गाण्यांवर ते सतत रील्स बनवतात. आता नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही सध्याचं ट्रेंडिंग गाणं ‘गुलाबी साडी’वर डान्स केला असून हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (avinash narkar and aishwarya narkar reel)
‘गुलाबी साडी’ या गाजलेल्या गाण्यावर नारकर जोडप्याने रील बनवला आहे. यामध्ये दोघंही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या डान्समध्ये दोघांची एनर्जी दिसत आहे. ‘फेस्टिवल वाईब’ असे कॅप्शन देत त्यांनी रील शेअर केले आहे. तसेच त्यांनी यामध्ये ऐश्वर्या यांनी हिरव्या गुलाबी रंगाची साडी नेसली आहे तर अविनाश यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता व निळ्या रंगाची जीन्स परिधान केला आहे.
नारकर दांपत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्या अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “मी माझ्या नवऱ्याबरोबर अशीच रील करणार आहे”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “महाराष्ट्रातील सर्वात तरुण जोडप्याला नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा”, असे म्हणत त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये विरोचकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहे. ही त्यांची नकारात्मक भूमिका असून त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.सध्या ही मालिका खूप रंजक वळणार पोहोचली असून या मालिकेमध्ये अजिंक्य नानावरे तसेच अविनाश हे ‘कन्यादान’ या मालिकेत दिसून आले होते.