गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाची धामधूम सर्वत्र पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात ही जोडी विवाहबंधनात अडकली. दोघांच्या लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश विशेष चर्चेत राहिलेले पहायला मिळाले. कोणताही थाटमाट न करता लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीचे विशेष कौतुकही झाले. लग्नानंतर आता ही जोडी त्यांच्या संसारात रमलेली पाहायला मिळत आहे. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate story)
मुग्धा व प्रथमेशच्या लग्नापूर्वी मुग्धाच्या बहिणीच्या म्हणजेच मृदुल वैशंपायनच्या लग्नाचीही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. मुग्धा व प्रथमेश या दोघांनीही मृदुलच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटोस सोशल मीडियावरून शेअर केले होते. प्रथमेश लघाटे खास मेहुणीच्या लग्नासाठी सासरी पोहोचला होता. अत्यंत साधेपणाने हे मृदुलच्या लग्नातील विधी पार पडले. यांत तिच्या पारंपरिक अंदाजाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

मुग्धाच्या बहिणीचं अत्यंत साधेपणाने, कोणताच अवाढव्य खर्च वा थाटमाट न करता लग्न पार पडलं. मृदुलने विश्वजीत जोगळेकरसह लगीनगाठ बांधली. काल मुग्धाच्या बहिणीच्या नवऱ्याचा वाढदिवस होता. यानिमित्त मुग्धा व प्रथमेश दोघांनीही हटके शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. मेहुणीच्या नवऱ्याच्या वाढदिवसाला प्रथमेशने “वाढदिवसाच्या शुभेच्छा मोठे साडू”, असं म्हणत दोघांचा एकत्र एक फोटो शेअर केला होता. तर मुग्धानेही तिच्या लाडक्या भावजींना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – Video : हळद लागताच रडू लागली पूजा सावंत, मंडपातील ‘तो’ भावुक व्हिडीओ व्हायरल
मुग्धाच्या भावजींच्या वाढदिवसानिमित्त तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर विश्वजीतबरोबरचे काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने लिहिले “वाढदिवसाच्या शुभेच्छा जीज”. मुग्धाने ही पोस्ट विश्वजीतला टॅगही केली आहे. फोटोवरुन मुग्धा व विश्वजीतमध्ये चांगले बॉन्डिंग असल्याचे दिसून येत आहे. लग्नानंतर मुग्धा व प्रथमेशने कामाला सुरुवात केली आहे. गायनसेवेसाठी दोघेही अनेक ठिकाणी दौरे करतानाही दिसतात.